Team India : भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वासाठी बुमराह तयार, म्हणाला संधी मिळाल्यास सन्मान…

कोहलीने संघाच्या बैठकीत त्याच्या पद सोडण्याच्या निर्णयाबद्दल त्याच्या सहकाऱ्यांना कळवले होते आणि संघ त्याच्या निर्णयाचा आदर करतो असे बुमराहने यावेळी सांगितले.

Team India Bumrah ready to lead Indian Test team
Team India : भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वासाठी बुमराह तयार, म्हणाला संधी मिळाल्यास सन्मान...

भारताचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी सामन्यातील कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. कोहलीनंतर संघाचे टेस्टमध्ये नेतृत्व कोण करणार अशी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान यामध्ये अनेक खेळाडूंची नावांची चर्चा सुरु आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपले मत व्यक्त केलं आहे. बुमराह म्हणाला की, जर भविष्यात संघाचे नेतृत्व कऱण्याची संधी मिळाली तर ती जबाबदारी निभावण्यात कोणतीही कमी होऊ देणार नाही. रोहित शर्मा पुढील वर्षात ३५ वर्षांचा होईल अशामध्ये चर्चा सुरु आहे की, संघाचे नेतृत्व दीर्घकाळ कोण करु शकते? यामध्ये बुमराहलासुद्धा कर्णधारपदाच्या शर्यतीमध्ये प्रबळ दावेदान मानन्यात येत आहे.

कर्णधारपदाच्या शर्यतीमध्ये जसप्रीत बुमराहच्या नावाची चर्चा सुरु आहे. यावर बुमराहकडून प्रतिक्रिया आली आहे. बुमराह म्हणाला की, जर संधी मिळाली तर सन्मानाची गोष्ट आहे. मला नाही वाटत कोणताही खेळाडू या संधीला नाही म्हणेल आणि मी अपवाद नाही. कोणतेही नेतृत्व असो त्याच्यासाठी मी नेहमी आपले सर्वश्रेष्ठ योगदान देईल असे बुमराह म्हणाला आहे.

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वनडे मालिकेत बुमराह उप कर्णधार असणार आहे. जबाबदारी घेणे आणि ती पूर्ण करणे स्वभाविक गुण असल्याचे बुमराहने म्हटलं आहे.

बुमराह म्हणाला, “मी ही परिस्थिती त्याच प्रकारे पाहतो. जबाबदारी घेणे आणि खेळाडूंशी बोलणे आणि त्यांना मदत करणे हा माझा नेहमीचा दृष्टिकोन राहिला आहे आणि परिस्थिती कोणतीही असो हाच माझा दृष्टिकोन राहील. कोहलीने संघाच्या बैठकीत त्याच्या पद सोडण्याच्या निर्णयाबद्दल त्याच्या सहकाऱ्यांना कळवले होते आणि संघ त्याच्या निर्णयाचा आदर करतो असे बुमराहने यावेळी सांगितले.


हेही वाचा : IPL 2022 : श्रेयस अय्यरला लागली लॉटरी, एका संघाकडून कॅप्टन्सीची ऑफर