भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण

आयपीएलनंतर (Indian Premier League) भारतीय संघ दोन मालिका खेळणार होता. त्यामधील पहिली मालिका ही दक्षिण आफ्रिकेसोबतची झाली. त्यानंतर आता इंग्लंडशी (England) कसोटी सामना होणार आहे. मात्र या कसोटी (Test) सामन्यापूर्वी भारतीय संघासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

आयपीएलनंतर (Indian Premier League) भारतीय संघ दोन मालिका खेळणार होता. त्यामधील पहिली मालिका ही दक्षिण आफ्रिकेसोबतची झाली. त्यानंतर आता इंग्लंडशी (England) कसोटी सामना होणार आहे. मात्र या कसोटी (Test) सामन्यापूर्वी भारतीय संघासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. भारताचा कर्मधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी रोहितची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यानंतर या चाचणीत त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता कसोटी मालिकेत रोहितच्या जागी कोणाला संधी दिली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (team india captain rohit sharma tests positive for covid 19)

भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना १ जुलै रोजी होणार आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच इंग्लंड दौऱ्यातील पाचवा कसोटी सामना स्थगित करण्यात आला होता. मात्र आता वर्षभरानंतर हा सामना होत असतानाही कोरोनाचे खेळाडूंवरील संकट दुरावलेले नाही.

सलामीवीर के. एल राहुलही सध्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यावर आलेला नाही. अशातच रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्याने संकट आणखी वाढले आहे. रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवूव आहे.

रोहितने गेल्यावर्षी इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाकडून सर्वाधिक रन केले होते. त्यानं चार मॅचमध्ये एका शतकासह ३६८ धावा केल्या. त्याची सरासरी ५२.२७ होती. भारतीय संघ या सीरिजमध्ये २-१ ने पुढे आहे. २००७ साली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये शेवटची टेस्ट सीरिज जिंकली होती. दरम्यान हा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे.


हेही वाचा – राज्यभरात बीए ४-५ प्रकारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ