IND vs NZ 3rd ODI: वनडे मालिकेत भारताचा न्यूझीलंडला क्लीन स्वीप

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. आज झालेल्या अखेरच्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर मात करत आणि ३-० अशी आघाडी मिळवत न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिला आहे. हा विजय मिळवून भारतीय संघाने ही मालिका आपल्या नावे केली आहे.

या सामन्यात भारताने उत्कृष्ट कामगिरी करत न्यूझीलंडवर ९० धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने शतक पूर्ण करत १०१ इतक्या धावा केल्या आहेत. तर शुभमन गीलने ११२ धावा केल्या आहेत. तर ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने ५८ धावा पूर्ण करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

न्यूझीलंडने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने न्यूझीलंडला विजयासाठी ३८६ धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला ४१.२ ओव्हरमध्ये २९५ धावांवरच ऑलआऊट केलं. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक १३८ धावांची खेळी केली. तर हेनरी निकोलसने ४२ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना मैदानात फार टिकू दिलं नाही. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे भारताने न्यूझीलंडवर ९० धावांनी शानदार विजय मिळवला. दरम्यान, भारताने पहिल्या वनडेमध्ये १२ धावा आणि दुसऱ्या वनडेत ८ विकेट्सने मालिका जिंकली होती.


हेही वाचा : ICCने केली टी20 टीम ऑफ द ईयरची घोषणा, या स्टार भारतीय खेळाडूंचा समावेश