घरक्रीडाटीम इंडियात दबावाच्या परिस्थितीत खेळ उंचावण्याची क्षमता नाही - गंभीर

टीम इंडियात दबावाच्या परिस्थितीत खेळ उंचावण्याची क्षमता नाही – गंभीर

Subscribe

सध्याच्या भारतीय संघात दबावाच्या परिस्थितीत खेळ उंचावण्याची क्षमता नाही. त्यामुळेच त्यांना आयसीसीच्या जागतिक स्पर्धा जिंकण्यात अपयश येत आहे, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केले. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने क्रिकेटच्या तीनही प्रकारांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. परंतु, त्यांना जागतिक स्पर्धा जिंकता आलेली नाही. मागील वर्षीच्या विश्वचषकात भारताने उपांत्य फेरी गाठली होती. परंतु, आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या निराशाजनक खेळामुळे भारताने उपांत्य फेरीतील न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावला.

सांघिक खेळात चांगल्या आणि महान खेळाडूमधील अंतर हे महत्त्वाच्या सामन्यांमध्ये कळते. मोक्याच्या क्षणी जो चांगली कामगिरी करतो, तोच महान खेळाडू असतो. सध्याच्या भारतीय संघात दबावाच्या परिस्थितीत खेळ उंचावण्याची क्षमता नाही असे मला वाटते. भारताला इतर संघांप्रमाणे दबाव हाताळला आलेला नाही. तुम्ही साखळी सामन्यांत अप्रतिम खेळ करता, पण उपांत्य आणि अंतिम फेरीत तुमची कामगिरी खालावत असल्यास तुम्ही मानसिकदृष्ट्या कणखर नाही हे कळते, असे गंभीर म्हणाला.

- Advertisement -

…तरच तुम्ही विश्वविजेते!

गंभीर २००७ टी-२० आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. आताचा भारतीय संघ जोपर्यंत स्वतः सिद्ध करत नाही, तोपर्यंत त्यांना विश्वविजेते म्हणता येणार नाही, असे गंभीरला वाटते. आपल्या संघात बरेच प्रतिभावान आणि सक्षम खेळाडू आहेत. परंतु, तुम्हाला मैदानात जाऊन स्वतःला सिद्ध करावे लागते. त्याशिवाय या संघाला विश्वविजेते म्हणता येणार नाही, असे गंभीरने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -