घरक्रीडाWTC फायनलमध्ये विराटला कॅप्टन्सी देण्याबाबत... भारताच्या माजी प्रशिक्षकांचा खुलासा

WTC फायनलमध्ये विराटला कॅप्टन्सी देण्याबाबत… भारताच्या माजी प्रशिक्षकांचा खुलासा

Subscribe

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला (WTC) इंग्लंडच्या ओव्हल स्टेडियममध्ये येत्या ७ जूनपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघ दुसऱ्यांदा जागतिक कसोटी स्पर्धेत फायनल खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलिया संघाचं आव्हान असणार आहे. भारतीय संघाकडून १५ खेळाडूंची घोषणा देखील करण्यात आली आहे. दरम्यान, या फायनल सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला कॅप्टन्सी मिळणार का?, याबाबत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठा खुलासा केला आहे.

भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोहलीला WTC फायनलच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्याची मागणी केली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोसोबत शास्त्री यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीला पुन्हा एकदा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून पाहायला आवडेल. शास्त्रींनी बर्मिंघममध्ये झालेल्या कसोटी सामन्याचं उदाहरण दिलं आणि ते म्हणाले की, माझी पसंत विराट कोहली होता. जेव्हा रोहितला दुखापत झाली, तेव्हा मला वाटलं विराटच नेतृत्व करेल. पण जसप्रीत बुमराहला कसोटी सामन्याच कर्णधार बनवलं गेलं. त्यावेळी कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्याची गरज होती, असं मला वाटतं. कारण त्याच्याच नेतृत्वात आपण इंग्लंडमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली होती, असं शास्त्री म्हणाले.

- Advertisement -

जर मी तिथे असतो तर नक्कीच कोहलीला कॅप्टन्सी देण्याबाबत मॅनेजमेंटसोबत चर्चा केली असती. पण मला विश्वास आहे की, राहुल द्रविडनेही असाच विचार केला असेल, असं शास्त्री म्हणाले.

या दौऱ्यात निवडलेल्या भारतीय संघाचे १५ सदस्य इंग्लंडला जाणार आहेत. यांच्यासोबतच आणखी खेळाडूही भारतीय संघासोबत राहू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. त्यानुसार, सरफराज खान, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, नवदीप सैनी हे देखील इंग्लंडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण हे सर्व खेळाडू स्टँडबाय म्हणून जातील.

- Advertisement -

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी (25 एप्रिल) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) २०२३ फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ही घोषणा करताना अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) पुनरागमनाची संधी दिली आहे. बीसीसीआयने WTC च्या अंतिम सामन्यासाठी संघ जाहीर करताना रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे, याशिवाय शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट यांना संधी दिली आहे.


हेही वाचा : WTC Final 2023 : सुनील गावस्कर यांनी निवडली भारताची प्लेइंग


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -