घरक्रीडाबीसीसीआयचं ट्वीट; भगवी जर्सी केली जाहीर!

बीसीसीआयचं ट्वीट; भगवी जर्सी केली जाहीर!

Subscribe

टीम इंडिया येत्या ३० तारखेला भगव्या रंगाची जर्सी घालूनच इंग्लंडविरूद्ध खेळणार असल्याचं आता स्पष्ट झालं असून बीसीसीआयनं त्यांच्या ट्वीटर हँडलवरून या जर्सीचा लुक जाहीर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवरून बरीच चर्चा सुरू आहे. या जर्सीच्या रंगावरून टीका केली जात आहे. मात्र, ही जर्सी नक्की कशी असेल, यावर मात्र संभ्रम होता. टीम इंडियाच्या या नव्या जर्सीचे अनेक प्रकारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अखेर बीसीसीआयनं स्वत:च या नव्या जर्सीचे फोटो जाहीर केले आहेत. बीसीसीआयनं आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून या जर्सीचे फोटो जाहीर केले आहेत. या जर्सीच्या भगव्या रंगावरून बरीच टीका होत आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनादरम्यान देखील काही आमदारांनी या जर्सीच्या रंगावर आक्षेप नोंदवले होते. मात्र, येत्या ३० तारखेला टीम इंडिया हीच जर्सी घालून वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरूद्ध खेळणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

- Advertisement -

काय आहे या नव्या जर्सीमध्ये?

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी या जर्सीच्या रंगावर तीव्र आक्षेप घेतला होता. ‘भगवाच रंग का निवडण्यात आला?’ असा सवाल उपस्थित करत ‘हे रंगांचं राजकारण आहे’, अशी टीका त्यांनी केली होती. मात्र, आता हीच जर्सी कायम करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. या जर्सीमध्ये मागच्या बाजूचा आणि बाह्यांचा रंग हा भगवा असून पुढचा रंग निळाच ठेवण्यात आला आहे.


हेही वाचा – भारतीय संघाच्या भगव्या जर्सीवरुन राजकारण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -