नागपूर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेनंतर आता वनडे मालिका होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील तीन सामने 6 फेब्रुवारी, 9 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीला होणार आहेत. यामधील पहिला वनडे सामना नागपूरमध्ये गुरूवारी (6 फेब्रुवारी) होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ नागपूरमध्ये दाखल झाला आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ नागपुरच्या हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये मुक्कामी आहे. मात्र, या हॉटेलमध्ये जात असताना भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील राघवेंद्र द्विवेदी याच्यासोबत मजेशीर किस्सा घडला. सध्या या किस्स्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. (Team India india vs england odi series nagpur police stopped raghu to enter Radisson blue hotel)
नेमकं काय घडलं?
नागरपुरमध्ये इंग्लंडविरुद्धचा पहिला वनडे सामना खेळण्यासाठी भारतीय संघ नागपूरच्या हॉटेल रेडिसन्स ब्लूमध्ये दाखल झाला आहे. मात्र त्यावेळी भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील राघवेंद्र द्विवेदी म्हणजेच रघू याला पोलिसांनी अडवलं. रघू हा कोणीतरी चाहता असून हॉटेलमध्ये जायचा प्रयत्न करतो, असं पोलिसांना वाटलं. यावेळी एक नव्हे तर तीन तीन पोलिसांनी त्याला अडवलं. त्यावेळी रघूनं पोलिसांसोबत चर्चा केली. पोलिसांना ओळख पटवून दिली. त्यानंतर पोलिसांनी रघूला हॉटेलच्या दिशेने सोडलं. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एकानं अरे कोच है वो, टीम के साथ है, बस से उतरा है, असं म्हटलं.
View this post on Instagram
पोलीस आणि रघू यांच्यात घडलेला हा प्रकार एका कॅमेरात कैद झाला. त्यानंतर हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला असून, विविध कमेंटही त्या व्हिडीओवर आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यना, भारतीय संघानं इंग्लंडला पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत 4-1 ने पराभूत केलं आहे. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील भारतीय संघ पुन्हा वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे.
रघू उर्फ राघवेंद्र द्विवेदी कोण आहे?
- राघवेंद्र द्विवेदी उर्फ रघू हा भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट टीमचा महत्त्वाचा सदस्य आहे.
- थ्रोडाऊन स्पेशालिस्ट म्हणून तो संघासोबत आहे.
- भारतीय फलंदाजी मजबूत करण्यामध्ये त्याचं महत्त्वाचं योगदान आहे.
- रघूला क्रिकेटमध्ये कामगिरी करुन दाखवायची होती. मात्र, हाताला दुखापत झाल्यानंतर तो प्रशिक्षणाकडे वळला.
- थ्रोडाऊनमध्ये तो स्पेशालिस्ट असल्यानं आणि प्रामुख्यानं 150 किमी/तास या वेगानं गोलंदाजी करत असल्यानं कर्नाटकच्या संघाचं लक्ष त्यानं वेधून घेतलं.
- रघूला भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये घेण्याचा सूचना सचिन तेंडुलकर यांनं दिल्या होत्या.
- त्यानुसार 2011 पासून रघू भारतीय क्रिकेट संघासोबत आहे.
हेही वाचा – IND VS ENG : टी-20 मालिकेतील उत्तम गोलंदाजीचे मिळाले बक्षीस, फिरकीपटूला वनडे संघात संधी