ऋषभ पंत, दिनेश कार्तिक दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कोणाला मिळणार संधी; रोहित शर्माने दिले उत्तर

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 15 सदस्यीय संघात ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोघांचाही समावेश आहे. पण या दोघांपैकी प्लेइंग 11मध्ये कोण असेल याबाबत कोणतेही स्पष्ट धोरण नाही. संघाने ऋषभ पंतला आशिया कपमध्ये संधी दिली, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत दिनेश कार्तिकला प्राधान्य देण्यात आले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी दोघांची नावे आहेत. परंतु, कर्णधार रोहित शर्माने कोणाला संधी मिळेल याबाबत उत्तर दिले आहे. (Team India Indian Cricket Team Rohit Sharma Rishab Pant and Dinesh Karthik South Africa)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने दमदार विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पंत आणि कार्तिक यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्तर दिले आहे.

संघ व्यवस्थापनाला विश्वचषकापूर्वी दोन्ही खेळाडूंना जास्तीत जास्त संधी द्यायची आहेत. आशिया चषकात दोघेही आमच्या यादीत होते, पण मला वाटते की दिनेशला अधिक संधी मिळायला हव्यात. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने फक्त 3 चेंडू खेळले आहेत आणि ते पुरेसे नाही. कार्तिकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 7 चेंडू खेळले आणि पंतला अशा सामन्यात संधी मिळाली जिथे त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

पंतलाही अधिक सामन्यांमध्ये संधी मिळायला हवी पण मालिका कशी पुढे जाते ते पाहायला हवे. 28 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या 3 सामन्यांच्या टी-20 मालिका सुरू होणार आहे. त्यावेळी “या दोघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवणे परिस्थितीवर अवलंबून असेल. मला माहित नाही की आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काय करू? आम्ही फक्त बघू. त्यांची बॉलिंग लाईन-अप. त्या लाइन-अपसाठी कोण योग्य असेल ते बघून ठरवेल”, असे रोहित शर्माने म्हटले.


हेही वाचा – भारताचा 6 गडी राखत ऑस्ट्रेलियावर विजय; 2-1 ने जिंकली टी-20 मालिका