Ind Vs Sa : कर्णधारपदाच्या वादामुळे टीम इंडियाला धक्का?, आफ्रिका दौऱ्यात लाजीरवाणी कामगिरी

टीम इंडियाचा टी-२० वर्ल्डकपमध्ये पराभव झाल्यानंतर सर्व क्रिकेट प्रेमी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची वाट पाहत होते. यावेळी टीम इंडिया इतिहास घडवेल अशी आशा चाहत्यांना होती. परंतु टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसमोर कमजोर पडली. त्यामुळे टीम इंडियाला इतिहास रचता आलेला नाहीये. कसोटी सामन्यांमध्ये इंडियाचा १-२ ने पराभव झाला. वनडे सीरिजमध्ये एकही सामना जिंकता आलेला नाहीये.

जेव्हा टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. त्यानंतर संपूर्ण टीम वादाच्या भोवऱ्यात सापडली. टी-२० वर्ल्डकपनंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडले. तसेच निवडकांनी सुद्धा विराटच्या कर्णधारपदाबाबत घोषणा केली होती. घोषणेनंतर विराटला वनडेच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले.

विराट आणि बासीसीआयमध्ये वादाची ठिणगी पेटली. तरीसुद्दा अशा परिस्थितीत टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत मालिका खेळत होती. मात्र, या वादामुळेच टीम इंडियावर मोठा प्रभाव पडला आणि संपूर्ण वातावरण खराब झालं.

आफ्रिका दौऱ्यात लाजीरवाणी कामगिरी

विराटचं वनडे मालिकेतील कर्णधारपद रोहितकडे

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये हिटमॅन रोहित शर्माला उपकर्णधारपद देण्यात आलं होतं. परंतु प्रेस रिलीझनंतर विराटकडे वनडेचं कर्णधारपद नसेल, अशी माहिती समोर आली. त्यानंतर विराटचं कर्णधारपद हिसकावून रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं.

कोहलीची पत्रकार परिषद

दक्षिण आफ्रिकेत रवाना होण्यापूर्वीच कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये टी-२० आणि वनडेच्या कर्णधारपदाबाबत घोषणा करण्यात आली. त्यानंतर बीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासोबत कोहली विरूद्ध बीसीसीआय असा वाद निर्माण झाला. त्यानंतर सौरव गांगुली यांनी विराट कोहलीला टी-२०चं कर्णधारपद सोडण्यासाठी आवाहन केलं होतं.

दरम्यान, ३१ डिसेंबर रोजी टीम इंडियाने वनडे टीमची घोषणा केली. परंतु मुख्य निवडक चेतन शर्माने संपूर्ण लक्ष हे विराट कोहलीवर ठेवलं होतं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यानंतर निवडकांनी सुद्धा विराटला कर्णधारपदावरून हटवले होते.


हेही वाचा : Mumbai kamla building fire : मुंबईतील कमला इमारतीला लागलेल्या आगीत मृतांची संख्या ७ वर, ८ जणांची प्रकृती गंभीर