IND Vs SA : दक्षिण आफ्रिकेविरोधात सलग ७ व्या मालिकेत टीम इंडिया पराभूत, ७ विकेट्सने दक्षिण आफ्रिकेचा विजय

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसऱ्या कसोटी सामनाचा आज(शुक्रवार) शेवटचा दिवस होता. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखत टीम इंडियावर दणदणीत असा विजय मिळवला आहे. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका २-१ अशी ठरली. टीम इंडियाच्या या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न अर्धवट राहीले आहे.

टीम इंडियाने दक्षिण आफिकेसाठी २१२ चं आव्हान दिलं होतं. परंतु ७ गडी राखत दक्षिण आफ्रिकेने हे आव्हानं पूर्ण केलं आहे. दक्षिण आफिकेकडून कीगस पीटरसनने ८२ धावा काढल्या आहेत. टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात ११३ धावांनी जिंकत चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर जोहान्सबर्गमध्ये दुसरा सामना सात विकेटसने गमावला होता. टीम इंडियाने आतापर्यंत सात वेळा दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका हाहातून गमावली आहे. दोन्ही संघामध्ये १९ जानेवारीपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे.

एडन मारक्रमनं २२ बॉलमध्ये १६ धावा काढल्या आहेत. डीन एल्गार आणि किगन पीटरसनने संघाचा डाव सांभाळला. पीटरसन ८२ धावांवर असताना शार्दुल ठाकुरने त्याची दांडी उडवली. रस्सी वॅन दर दुस्सेनने ४१ धावा आणि टेम्बा बवुमाने ३२ धावा काढत नाबाद राहीले आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात किगन आणि दुस्सेननं तिसऱ्या गड्यासाठी मोठी भागीदारी केली.

आफ्रिकेच्या विजयासाठी २१२ धावांचे आव्हान

भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुलने दुसऱ्या डावात १० धावा केल्या. परंतु वेगवान गोलंदाज जानसेनने त्याला गोलंदाज केले. मयंक अग्रवालने सात धावा केल्या. तर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने संघासाठी अर्धशतक पूर्ण केलं. अजिंक्य रहाणे मैदानात चांगली सुरूवात करण्यासाठी पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. कगिसो रबाडाने त्याला १ धावांवर बाद केले. विराटने २९ धावा काढल्यानंतर भारतीय संघाचे १५२ धावांवर ५ गडी माघारी परतले. परंतु भारतीय खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या विजयासाठी २१२ धावांचे आव्हान दिले. मात्र, आफ्रिकेने भारतीय संघाचे आव्हान सहज पूर्ण केले आहे.

असे आहेत उभय संघ –

भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, रवीचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

दक्षिण आफ्रिका संघ

डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जानसेन, कगिसो रबाडा, कीगन पीटरसन, रुसी व्हॅन डर ड्यूसेन, टेम्बा बावुमा, लुंगी एनगिडी, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर.


हेही वाचा : IND vs SA : तू अपरिपक्व… विराटच्या ‘त्या’ वर्तवणूकीवर गौतम गंभीर भडकला