Eco friendly bappa Competition
घर क्रीडा अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला सुपर 4 मध्ये जिंकावे लागणार तीनपैकी दोन...

अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला सुपर 4 मध्ये जिंकावे लागणार तीनपैकी दोन सामाने

Subscribe

सध्या आशिया चषकाचे घमासान सुरू आहे. या चषकातील श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघामधील सामना संपल्यानंतर सुपर-4 ची अडथळ्यांची शर्यत सुरू झाली आहे.

नवी दिल्ली : काल विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड समितीने घोषणा केली आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या आशिया चषकातील भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता आशिया चषकातील सुपर-4 चे सामने सुरू झाले असून, भारताला या अडथळा फेरीतील तीनपैकी दोन सामने जिंकावेच लागणार असून, त्यानंतरच टीम इंडियाला अंतिम फेरी गाठता येणार आहे.(Team India needs to win two out of three matches in Super 4 to reach the finals)

सध्या आशिया चषकाचे घमासान सुरू आहे. या चषकातील श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघामधील सामना संपल्यानंतर सुपर-4 ची अडथळ्यांची शर्यत सुरू झाली आहे. या अडथळ्यांच्या शर्यतीत भारतीय संघाला चार सामने खेळावे लागणार आहेत. त्यामध्ये शेवटचा सामना हा अंतिम असणार आहे तर उरलेल्या 3 पैकी 2 सामने भारतीय संघाला जिंकावेच लागणार असल्याने भारतीय संघातील खेळाडूना आता त्यांच्या खऱ्या कर्तबागारीचे दर्शन घडवावे लागणार आहे.

असे असणार सुपर-4 भारताचे सामने

- Advertisement -

आशिया चषकात आता सुपर-4 चे सामने सुरू होणार आहेत. त्यामध्ये भारताचा पहिला सामना हा 10 सप्टेंबरला होणार आहे. भारताचा हा पहिला सामान पाकिस्तानबरोबर होणार आहे. हा सामना कोलंबोमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर सुपर 4 मधील भारताचा दुसरा सामना हा श्रीलंका या संघाबरोबर 12 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. सुपर 4 मध्ये भारताचे हे दोन सांमने तीन दिवसांत होणार आहेत. पण हे दोन्ही सामने मात्र एकाच मैदानात खेळविले जाणार आहेत. सुपर 4 मध्ये भारताचा तिसरा सामना हा शुक्रवारी 15 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारताचा सुपर 4 मधील अखेरचा आणि तिसरा सामना हा बांगलादेशच्या संघाबरोबर होणार आहे.

हेही वाचा : किरीट सोमय्यांचा ‘तो’ कथित VIDEO प्रसारित करणे भोवले; वृत्तवाहिनीच्या संपादकावर गुन्हा दाखल

पाकिस्तानला हरवणे अनिवार्य

- Advertisement -

सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ असणार आहे. 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यात पावसाचा अडथळा न येताही भारताना पाकिस्तानला हरवणे अनिवार्य असणार आहे. कारण, त्यानंतर भारताची पुढील रणनिती ठरून ठोस पाऊल टाकता येणार आहेत.

हेही वाचा : जानेवारी 2024 नंतर कधीही आचारसंहिता लागू शकते, शिंदे गटाच्या मंत्र्याचे संकेत

आज दुपारी पाकिस्तानविरुद्ध बांगलादेश

आशिया चषकातील सर्वात महत्वाचा आणि प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेल्या पाकिस्तानविरुद्ध बांगलादेश यांच्यात आज दुपारी दोन वाजता सामन्यास सुरूवात होणार आहे. या दोघांच्या लढतीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisment -