घरक्रीडाभारताच्या पराभवानंतर सुनील गावस्कर आक्रमक, संघाची चूक आणली समोर; वाचा काय म्हणाले?

भारताच्या पराभवानंतर सुनील गावस्कर आक्रमक, संघाची चूक आणली समोर; वाचा काय म्हणाले?

Subscribe

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने 10 गडी राखून भारताचा पराभव केला. या पराभवानंतर क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. अनेक तज्ज्ञही या पराभवावर आणि भारतीय संघाच्या खेळीवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने 10 गडी राखून भारताचा पराभव केला. या पराभवानंतर क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. अनेक तज्ज्ञही या पराभवावर आणि भारतीय संघाच्या खेळीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. अशातच या पराभवामध्ये भारतीय संघाची काय चूक झाली याचे स्पष्टीकरण माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी दिले आहे. (Team India Not Need Batting Coach Presence Of Rahul Dravid AlsoNot Need Support Staff MoreThan Player Says Sunil Gavaskar)

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाला चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यावरून सुनील गावस्कर यांनी सांगितले की, “तुमच्याकडे ऑल टाइम फेव्हरेट फलंदाज राहुल द्रविड असताना तुम्हाला फलंदाजीच्या प्रशिक्षकाची गरज नाही. जेव्हा राहुल द्रविड काही तरी सांगतात तेव्हा विक्रम राठोड अजून काही तरी सांगतात, त्यामुळे फलंदाज अधिक गोंधळतो. तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे की अधिक सपोर्ट स्टाफची गरज नाही आणि त्यांना संघासोबत पाठवण्याची गरज नाही. फक्त त्यांनाच पाठवा ज्यांची गरज आहे”, असे म्हटले.

- Advertisement -

याशिवाय, “संघातील सदस्यांपेक्षा सपोर्ट स्टाफची संख्या अधिक असल्याचे समजताच मला धक्का बसला. अशाने खेळाडू अधिक गोंधळून जातात, त्यांना कळत नाही की नेमक कोणाचे ऐकायचे आणि कोणाचे नाही”, असेही यावेळी सुनील गावस्कर यांनी म्हटले.

दरम्यान, सुनील गावस्कर यांनी भारताच्या सध्याच्या सपोर्ट स्टाफची तुलना १९८३च्या भारतीय संघाशी केली. त्यावेळी आमच्यासोबत फक्त एक मॅनेजर होता. १९८५ साली देखील हीच परिस्थिती होती. तसेच, २०११ साली जेव्हा भारताने वर्ल्डकप जिंकला होता तेव्हा संघासोबत अधिक सपोर्ट स्टाफ नव्हता.

- Advertisement -

हेही वाचा – ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वरून सुनील गावस्करांनी भारतीय खेळाडूंना फटकारले; म्हणाले…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -