घरक्रीडाटीम इंडियाचे खेळाडू बंडखोरीच्या पवित्र्यात, कोहली विरोधात जय शाह कडे तक्रार

टीम इंडियाचे खेळाडू बंडखोरीच्या पवित्र्यात, कोहली विरोधात जय शाह कडे तक्रार

Subscribe

कोहलीच्या नेट प्रॅक्टिसदरम्यान प्रशिक्षकांनी त्याच्या फलंदाजीबाबत सल्ला दिला तेव्हा प्रशिक्षकावर विराट रागावला होता.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी२० वर्ल्डकपच्यानंतर टी२०मधील कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा विराट कोहलीने केली आहे. विराट कोहलीने अधिकृत निवेदन आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रसारित केलं आहे. ही घोषणा केल्यानंतर विराटवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. विराट कोहलीला असे वाटत होते की, टीम इंडिया फलंदाज रोहित शर्माला उपकर्णधार पदावरुन दूर करण्यात यावे परंतु विराटचा हा दावा उलटा पडल्यामुळे दबावात विराटनेच कर्णधारपदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच विराट कोहलीची वागणूक संघातील खेळाडूंना फारशी आवडत नसल्यामुळे खेळाडूंनी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे विराटविरोधात तक्रार केली आहे.

भारतीय कर्णधार विराट कोहलीविरोधात अनेक आरोप करण्यात येत असून अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. विराट कोहलीने कर्णधार पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यापासून त्याच्याविरोधातील अनेक गोष्टींना वाचा फुटले आहे. न्यूजीलँडविरुद्ध वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीने आपला सम्मान गमावला आहे. एका वृत्तवाहिनीने असे म्हटलं आहे की, विराट कोहली आपला संयम गमावत आहेत. विराट कोहलीची वागणूक आता संघातील खेळाडूंना फारशी आवडत नाही. कोहली आता प्रेरणादायी खेळाडू राहिला नसून खेळाडूंचा सम्मानही करत नाही असा आरोप खेळाडूंनी केला आहे.

- Advertisement -

विराटच्या वक्तव्यार टीम नाराज

न्यूजलँडविरुद्ध वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलमध्ये फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले होते. यामध्ये गोलंदाजही अपयशी ठरले. या सामन्यात पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीने केलेल्या वक्तव्यामुळे खेळाडूंमध्ये नाराजी पसरली आहे. विराट कोहलीने म्हटलं होते की, खेळाडूंमध्ये ती जिद्द आणि चिकाटी राहिली नाही. विराटच्या याच वक्तव्यामुळे खेळाडू नाराज झाले. तसेच कोहलीच्या नेट प्रॅक्टिसदरम्यान प्रशिक्षकांनी त्याच्या फलंदाजीबाबत सल्ला दिला तेव्हा प्रशिक्षकावर विराट रागावला होता. कोचने सल्ला दिल्यावर मला कन्फ्यूज करु नका असे म्हणाला होता. परंतु हे प्रकरण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यामुळे अधिक वाढले आहे.

विराटच्या अडचणी वाढणार

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी२० वर्ल्ड कपनंतर समाप्त होत आहे. अशामध्ये सौरव गांगुली यांच्या नेतृत्वात बीसीसीआय नव्या मुख्य प्रशिक्षकांसाठी टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबले आणि विविएस लक्ष्मण यांच्यातील एकाला मुख्य प्रशिक्षक करण्याची शक्यता आहे. कर्णधार विराट कोहलीसोबत असलेल्या मतभेदांमुळे ४ वर्षांपुर्वी अनिल कुंबळेंनी आपलं पदाचा राजीनामा दिला होता. आता पुन्हा अनिल कुंबळे यांना मुख्य प्रशिक्षक केल्यावर विराटच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनिल कुंबळे हे यापुर्वी २०१६ ते १७ या कालावधीत भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. आता पुन्हा एकचा मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीमध्ये अनिल कुंबळे यांचे नाव प्रथमस्थानी आहे.

- Advertisement -

हेही वाचा : विराट कोहलीच्या अडचणी वाढणार, अनिल कुंबळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याची शक्यता?


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -