घरक्रीडाइंग्लंडविरुद्ध फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज

इंग्लंडविरुद्ध फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज

Subscribe

मंगळवारी १७ जुलैला होण्याऱ्या निर्णायक मॅचमध्ये आपल्या टीममधील कमतरता दूर करत फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.

मागच्या मॅचमध्ये इंग्लंडकडून हरल्यानंतर मंगळवारी १७ जुलैला होण्याऱ्या निर्णायक मॅचमध्ये आपल्या टीममधील कमतरता दूर करत फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. तीन मॅचच्या या सिरीजमध्ये पहिली मॅच जिंकल्यानंतर भारताला दुसऱ्या मॅचमध्ये ८६ रन्सनं हार पत्करावी लागली होती. त्यामुळं दोन्ही संघानं १ – १ अशी बरोबरी केली आहे. तिसरी आणि निर्णायक मॅच जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करणार असून ही मॅच चुरशीची होईल.

मधली फळी भारतासाठी चिंताजनक

भारताला अद्यापही चौथ्या स्थानावर खेळण्यासाठी योग्य खेळाडू मिळाल्याचं दिसत नाही. त्यामुळं सध्या भारतासाठी मधली फळी ही चिंताजनक बाब आहे. वनडेमध्ये मधली फळी मजबूत असणं गरजेचं आहे. सध्या भारतीय टीम ही रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली यांच्यावर अवलंबून आहे. सध्या चौथ्या स्थानावर लोकेश राहुल खेळत आहे. मात्र अजूनपर्यंत लोकेशला चांगली कामगिरी करता आलेली नाही. लॉर्ड्सवर झालेल्या मॅचमध्येही लोकेश शून्यावर बाद झाला होता. त्यामुळं सध्या भारतासाठी मध्यक्रम चिंतेची बाब आहे.

- Advertisement -

कोहली, धवन आणि रोहितवर टीम अवलंबून

एम. एस. धोनीदेखील मधल्या फळीमधला चांगला बॅट्समन आहे. मात्र वनडेमध्ये धोनी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. कॅप्टन कोहली आणि कोच रवी शास्त्री दोघांचंही धोनीला समर्थन आहे. मात्र तरीही सध्या कोहली, धवन आणि रोहितवर टीम अवलंबून आहे. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये ६० टक्के रन्स या तीन बॅट्समनने केल्या आहेत. त्यामुळं निर्णायक मॅचमध्येदेखील या तीन बॅट्समनकडेच प्रेक्षकांचे लक्ष असेल.

इंग्लंड वनडेमधील क्रमांक एक टीम

आयसीसी रँकिंकमध्ये वनडे मॅचमध्ये इंग्लंडनं आपलं स्थान भक्कम करत एक क्रमांक पटकावला आहे. दोन्ही संघ बलाढ्य असून पुढच्या वर्षी येणाऱ्या विश्वकपाच्या तयारीनंच दोन्ही संघ खेळण्यासाठी उतरतील. ही मॅच निर्णायक असून भारत या मॅचसाठी संपूर्ण तयारीनिशी उतरणार हे निश्चित.

- Advertisement -

भारतीय टीम – विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, महेंद्र सिंह धोनी, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, सिद्धार्थ कौल, अक्षर पटेल, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार.
इंग्लंडची टीम – इयान मॉर्गन (कॅप्टन), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, मोईन अली, जो रूट, जॅक बॉल, लियाम प्लँकेट, बेन स्टॉक्स, आदिल राशीद, डेव्हिड व्हिली, मार्क वूड, जेम्स विन्स.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -