टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज, बीसीसीआयकडून फोटो शेअर

भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ ने जिंकल्यावर भारतीय संघ आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाले असून बीसीसीआयकडून त्यासंदर्भात फोटो शेअर करण्यात आले आहेत.

भारत आणि झिबाब्वे यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १८ ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना २० ऑगस्ट आणि तिसरा सामना २२ ऑगस्टला खेळवला जाणार आहे. तसेच हे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १२.४५ वाजता सुरू होणार आहेत.

मालिकेला सुरूवात होण्यापूर्वीच यजमान झिम्बाब्वेच्या संघाचे प्रशिक्षक डेव्ह हॉटन यांनी भारतीय संघाला इशारा दिला आहे. आम्हाला हलक्यात घेऊ नका, असा इशारा हॉटन यांनी भारतीय संघाला दिला आहे. झिम्बाब्वेचा संघ हॉटन यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट कामगिरी करत आहे. झिम्बाब्वे संघाने अलीकडेच एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत बांगलादेशचा पराभव केला होता. तसेच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी क्वालिफाय केले आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्या यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर या दौऱ्यात केएल राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसत आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ –

केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टण सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.


हेही वाचा : आशिया चषकातून इशान किशनला डावलल्यानंतर व्यक्त केली नाराजी, म्हणाला…