घरक्रीडाTeam India Schedule 2022: टीम इंडियाचं भारतातले वर्षभरातील शेड्यूल वाचा, कधी आणि...

Team India Schedule 2022: टीम इंडियाचं भारतातले वर्षभरातील शेड्यूल वाचा, कधी आणि कोणत्या संघाविरूद्ध होणार सामने?

Subscribe

टीम इंडियाला यावर्षी भारतात अनेक सामने खेळायचे आहेत. मागील वर्षाप्रमाणे यंदाही आयसीसी टी-२० वर्ल्डकपचं आयोजन करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त टीम इंडियाचे सर्व खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहेत. भारतात यंदाच्या वर्षात इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशचाही दौरा करावा लागणार आहे. तसेच २०२२ मध्ये टीम इंडियाला सामने खेळावे लागणार आहे. परंतु ते कधी आणि कोणत्या संघाविरूद्ध होणार आहेत. ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आगामी महिन्यात टीम इंडिया विरूद्ध श्रीलंका

टीम इंडिया यावेळेस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. परंतु या दौऱ्यानंतर टीम इंडियाला श्रीलंकेसोबत दोन कसोटी आणि तीन टी-२० सामने खेळावे लागणार आहेत. परंतु या सामन्यांबाबत अद्यापही घोषणा करण्यात आलेली नाहीये.

- Advertisement -

मार्चमध्ये अफगाणिस्तानचा भारत दौरा

श्रीलंकेसोबत सामना खेळल्यानंतर टीम इंडिया अफगाणिस्तानसोबत सामना खेळणार आहे. मार्चमध्ये अफगाणिस्तानचा भारत दौरा असणार आहे. यामध्ये टीम इंडिया अफगाणिस्तानसोबतच वनडे सामना खेळणार आहे.

एप्रिल महिन्यात आयपीएल २०२२ चं आयोजन

२ एप्रिल २०२२ मध्ये आयपीएलचं आयोजन करण्यात करत आहे. परंतु भारतात कोरोना विषाणूने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने सुद्धा देशात थैमान घातलं आहे. त्यामुळे आयपीएल २०२२ चं आयोजन करण्यात येईल की नाही, याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

- Advertisement -

जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत टी-२० मालिका

आयपीएल २०२२ चं हंगाम संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसोबत पुन्हा एकदा पाच सामने टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. हे सामने टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये होणार आहेत. तसेच जूनमध्ये पाच सामन्यांसाठी टी-२० मालिका खेळण्यासाठी आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.


हेही वाचा : ऊसतोड कामगारांसाठी मोठा निर्णय ! ऊस गाळपानुसार प्रति टन दहा रूपयांचा फायदा मजुरांना मिळणार, शासन निर्णय जारी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -