घरक्रीडामुंबई विमानतळावर शार्दुल ठाकूरची बॅग गायब; हरभजन सिंहने मागितली माफी, वाचा नेमकं...

मुंबई विमानतळावर शार्दुल ठाकूरची बॅग गायब; हरभजन सिंहने मागितली माफी, वाचा नेमकं काय घडलं?

Subscribe

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरची किट बॅग मुंबई विमानतळावरून गायब झाल्याचा प्रकार घडला. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-२ वरून शार्दुलची किट बॅगच गायब झाली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अखेरचा सामना झाल्यानंतर घरी परतत असताना शार्दुलची बॅग गायब झाली.

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरची किट बॅग मुंबई विमानतळावरून गायब झाल्याचा प्रकार घडला. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-२ वरून शार्दुलची किट बॅगच गायब झाली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अखेरचा सामना झाल्यानंतर घरी परतत असताना शार्दुलची बॅग गायब झाली. याबाबत शार्दुलने ट्वीट करत माहिती दिली. मात्र त्याच्या ट्विटनंतर माजी खेळाडू हरभजन सिंग याने त्याच्या ट्विटला उत्तर देताना माफी मागितली. परंतु, शार्दुलची बॅग गायब होण्यामागे हरभजनचा काय संबंध असे सवाल अनेकांना पडले आहेत. तर जाणून घेऊया नेमकं हा किस्सा काय आहे? (Team India Shardul Thakur complains missing luggage Harbhajan Singh says sorry)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अखेरचा सामना खेळल्यानंतर सर्व खेळाडू आपल्या घरी परतले. त्यावेळी शार्दुलही घरी परतण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचला. मात्र, विमानतळावर येताच त्याच्या लक्षात आले की त्याची किटी बॅग गायब झाली आहे. हा सर्व प्रकार शार्दुल ठाकूर दिल्लीहून मुंबईला परतत असताना घडला.

- Advertisement -

आपली बॅग गायब झाल्याचे समजताच शार्दुलने ट्विटरवर याबाबत ट्विट करून मदत मागितली. शार्दुल ठाकूरने ट्विट केले की, ‘एअर इंडिया, मला लगेज बेल्टवर मदत करण्यासाठी कोणाला पाठवू शकता का? माझी किट बॅग वेळेवर न मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. तुमचा एकही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही.

शार्दुलच्या या ट्विटनंतर माजी क्रिकेटर हरभजन सिंग यापूर्वी एअर इंडियाचा कर्मचारी होता. त्यामुळे त्याने ट्विट करून शार्दुल ठाकूरची माफी मागितली. हरभजन सिंगने ट्विटला उत्तर देताना लिहिले, “शार्दुल, तू काळजी करू नकोस. तुला तुझे सामान नक्की मिळेल. आमचे कर्मचारी तिथे पोहोचतील. आम्ही तुम्हा खेळाडूंवर प्रेम करतो. त्रास झाल्याबद्दल क्षमस्व” असे हरभजन सिंगने म्हटले. हरभजनच्या या ट्विटनंतर शार्दुल ठाकूरनेही त्याला उत्तर दिले. ‘भज्जी पाजी, तुझ्यावर प्रेम आहेच, मला दुसऱ्या विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली. माझे सामान मला मिळाले. धन्यवाद.’

- Advertisement -

हेही वाचा – भारताची ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी; या कॅलेंडर वर्षात अनेक सामन्यांमध्ये विजय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -