घरक्रीडाआयसीसी रँकिंगमध्ये संजू, श्रेयश आणि शुभमनची भरारी, कोणत्या नंबरवर कोण?

आयसीसी रँकिंगमध्ये संजू, श्रेयश आणि शुभमनची भरारी, कोणत्या नंबरवर कोण?

Subscribe

न्यूझिलंड आणि भारतामध्ये तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका झाली. या सामन्यात श्रेयसने अर्धशतक केले. त्याचा फायदा श्रेयशला रँकींगमध्ये भरारी घेण्यात झाला. संजूला एका सामन्यात संधी मिळाली. त्या सामन्यात संजूने ३६ धावा केल्या. त्यामुळे तो ९४ स्थानावरुन थेट ८४ स्थानावर आला. 

दुबई: न्यूझीलंडविरोधातील एक दिवसीय सामन्यात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे भारतीय फलंदाज श्रेयश अय्यर, शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांनी आयसीसी रँकिंगमध्ये भरारी घेतली आहे. श्रेयश २७, गिल ३४ तर संजू ८२ स्थानावर पोहोचला आहे. आयसीसीने बुधवारी रँकिंगची यादी जाहीर केली.

न्यूझीलंड आणि भारतामध्ये तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका झाली. या सामन्यात श्रेयसने अर्धशतक केले. त्याचा फायदा श्रेयशला रँकिंगमध्ये भरारी घेण्यात झाला. संजूला एका सामन्यात संधी मिळाली. त्या सामन्यात संजूने ३६ धावा केल्या. त्यामुळे तो ९४ स्थानावरून थेट ८४ स्थानावर आला. शिखर धवनने मालिकेच्या सामन्यात अर्धशतक केले. मात्र त्याचे रँकिंग दोन अंकांनी खाली घसरले. विराट कोहली आणि रोहित शर्माला मालिकेत विश्रांती दिली गेली होती. परिणामी दोघांचे रँकिंग घसरले आहे. कोहली आठव्या तर रोहित नवव्या स्थानावर आला आहे.

- Advertisement -

न्यूझीलंडचे खेळाडू टाॅम लाथम आणि केन विलियमसनच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली. टाॅम लाथमने मालिकेच्या पहिल्या सामन्यात शतक मारले होते. त्यामुळे तो १८ व्या स्थानावर पोहोचला आहे. तर कर्णधार विलियमसनने पहिल्या सामन्यात ९४ धावा केल्या. या दमदार खेळीमुळे विलियमसनला पहिल्या दहामध्ये स्थान मिळाले आहे. गोलंदाजीतील उत्तम कामगिरीमुळे लाॅकी फर्ग्युसन ३४ व्या स्थानावर पोहोचला आहे. तर गोलंदाज मैट हैनरी पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम आहे. दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा इमाम-उल-हक आहे. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा रासी वैन डेर डूसेन आणि क्विटन डिकाॅक आहे. पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेविड वाॅर्नर आहे. यासह इंग्लंड, न्यूझीलंड आणि भारतीय खेळाडूंनी पहिल्या दहामध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. एक दिवसीय सामन्यातील कामगिरीवर खेळाडूंची रँकिंग ठरते. फलंदाने केलेल्या धावा आणि गोलंदाजाची कामगिरीवर रँकिंगमधील स्थान ठरते. संघाचेही रँकिंग ठरवले जाते.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -