Rohit Sharma New Look: हिटमॅन रोहित शर्माचं क्लीन-शेव्ह लूक पाहून चाहते झाले घायाळ, Photo Viral

टीम इंडियाचा वनडे मालिकेतील कर्णधार रोहित शर्मा आपल्या दुखापतीमुळे टीमच्या बाहेर आहे. रोहित सध्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये फिटनेसवर काम करत आहे. परंतु त्याने आपल्या नव्या लूकचा फोटा इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये तो नवीन लूक मध्ये दिसत आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडलेला ३५ वर्षीय खेळाडू सध्या त्याच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे. मात्र, रोहित शर्माने क्लीन-शेव्हचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा फोटो पाहून चाहत्यांना भुरळ पडली आहे. तसेच हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

मागील वेळेस दाढी ठेवणाऱ्या रोहित शर्माने आपली दाढी काढली आहे. क्लीन-शेव्ह केलेला एक नवीन चेहरा सध्या समोर दिसत आहे. क्लीन-शेव्ह केल्यामुळे तो १० वर्ष मागे गेल्यासारखं वाटत आहे. परंतु त्याच्या पत्नीने रोहितच्या नव्या लुकला कॉमेंट केली आहे.

रोहितची पत्नी रितिका सजदेहने एक काँमेंट केली आहे. एवढा बैचेन का आहेस, अशी प्रकरची कॉमेंट रितिकाने रोहितच्या फोटोवर केलीय. तसेच रोहितचा मित्र खलील अहमदने लिहिलंय की, हा लूक अंडर-१९ सारखा दिसत आहे. दरम्यान, अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया रोहितच्या फोटोला येत आहेत.


हेही वाचा : UP Elections 2022 : बलात्कार, हिंसाचाराने पिडित महिलांना निवडणुकीचे तिकिट, युपीत काँग्रेसचा मास्टर प्लान