IND vs SA ODI Series: दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाने फक्त एकदाच जिंकली वनडे मालिका, जाणून घ्या कुठे आणि कधी?

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टीम इंडियाने कसोटी मालिका हातातून गमावली असून आता वनडे मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसोबत पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. तीन वनडे मालिकांचा पहिला सामना १९ जानेवारीपासून पार्लमध्ये खेळला जाणार आहे. टीम इंडिया जुलै २०२१ नंतर पहिल्यांदाच वनडे मालिका खेळणार आहे. मागील वेळेस टीम इंडियाने जेव्हा श्रीलंकेविरूद्ध मालिका खेळली होती. तेव्हा टीम इंडियाचा गब्बर आणि फलंदाज शिखर धवन कर्णधार होता. आता हिटमॅन रोहित शर्मा टीम इंडियाच्या संघाचा कर्णधार झालाय. परंतु तो अनफिट असल्यामुळे या मालिकेत खेळणार नाहीये. केएल राहुल त्याच्याजागी कर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे.

टीम इंडियाचा पहिला आणि दुसरी वनडे मालिका पार्लमध्ये खेळवली जाणार आहे. १९ जानेवारी आणि २१ जानेवारी रोजी दुसरा सामना खेळवला जाणार आहे. तसेच २३ जानेवारीला केपटाऊनमध्ये तिसरी वनडे मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडियाचं लक्ष दुसऱ्यांदा विजयी होण्याकडे आहे. मागील वेळेस टीम इंडियाने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरात मालिकेत ४-१ ने हरवलं होतं.

टीम इंडिया सहाव्यांदा खेळणार द. आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिका

१९९२ – टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १९९२ साली सात सामन्यांची मालिका खेळण्यात आली होती. त्यानंतर आफ्रिका संघाने ५-२ अशी मालिका जिंकली होती. त्यावेळी कर्णधार केप्लर वेसल्स आणि टीम इंडियाचे कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन होते. दक्षिण आफ्रिकेने मालिकेच्या सुरूवातीला दोन सामने जिंकले होते. टीम इंडियाला तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला होता.

२००६ – टीम इंडिया १९९२ च्या प्रदीर्घ काळानंतर वनडे मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेली होती. पाच वनडे मालिका या दोन्ही संघामध्ये खेळण्यात आली. यावेळी सुद्धा दक्षिण आफ्रिकेने ४-० अशी मालिका जिंकली होती. त्यामुळे टीम इंडियाचा पुन्हा एकदा पराभव झाला होता. त्यावेळी आफ्रिकेचा कर्णधार ग्रीम स्मिथ आणि टीम इंडियाचा कर्णधार राहुल द्रविड होता.

२०११ – टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने पाच वनडे मालिका येथे खेळल्या होत्या. त्यावेळी सुद्धा ग्रीम स्मिथ कर्णधार होता. मात्र, टीम इंडियाला तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. कारण टीम इंडियाने २-३ अशी आघाडी मिळवली होती. त्यामुळे ती मालिका इंडियासाठी असफल ठरली.

२०१३ – महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तीन सामने खेळण्यात आले होते. परंतु एबी डिव्हिलियर्सच्या संघाने दोन सामन्यांमध्ये बाजी मारत टीम इंडियाला हरवलं होतं. कारण त्यावेळी संघाने फक्त एकच सामना जिंकला होता.

२०१८ – २०१३ या सालानंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामना जिंकत इतिहास रचला होता. रनमशीन विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिका जिंकली होती. सहा मालिकांच्या सामन्यात टीम इंडियाने ४-१ अशी मालिका जिंकली होती. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिस होता.


हेही वाचा : OBC reservation : ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय हा देशव्यापी – विजय वडेट्टीवार