IND vs SL : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरणार टीम इंडिया, कधी आणि कुठे पाहाल सामना?

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणार आहे. तर माजी कर्णधार विराट कोहली आपला १०० वा कसोटी सामना खेळणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळल्या जाणार्‍या कसोटी मालिकेत टीम इंडिया विजयासह गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करू इच्छित आहे. मात्र, दोन्ही संघांच्या गुणतालिकेवर नजर टाकल्यास, टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध मायदेशात आतापर्यंत २० कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये टीम इंडियाला १२ विजय मिळाले असून ९ सामने ड्रॉ झाले आहेत.

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना शुक्रवार म्हणजेच ४ मार्चपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना मोहाली येथील पीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता नाणेफेक होणार आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका मालिका स्टार नेटवर्कद्वारे प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे पहिला सामना देखील स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर प्रसारित केला जाईल.

असे आहेत दोन्ही उभय संघ –

टीम इंडिया संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार, आर अश्विन

श्रीलंका संघ –

दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), पथुम निसांका, लाहिरू थिरिमाने, धनंजया डी सिल्वा (उपकर्णधार), कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, चरित अस्लंका, निरोशन डिकवेला, चमिका करुणारत्ने, रमेश मेंडिस, लाहिरू कुमारा, सुरंगा लकमल, दुष्मंथा चमीरा, विश्वा फर्नांडो, जेफ्री वांडरसे, प्रवीण जयविक्रेमा, लसिथ एम्बुल्डेनिया


हेही वाचा : Maharashtra Assembly Budget Session 2022 : सतेज पाटलांनी सादर केल्या ६२५० कोटींच्या पुरवणी मागण्या