घरक्रीडाENG VS IND 5TH TEST : मेंचेस्टरमध्ये टीम इंडिया फडकवणार झेंडा

ENG VS IND 5TH TEST : मेंचेस्टरमध्ये टीम इंडिया फडकवणार झेंडा

Subscribe

भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड मेंचेस्टर येथे शुक्रवारपासून मालिकेतील पाचवा कसोटी सामना जिंकून इतिहास रचणार आहे. मालिकेतील तिसरी कसोटी जिंकून भारताला प्रथमच इंग्लंडमध्ये असे करण्याची संधी असेल. भारताने ओल्ड ट्रॅफर्ड येथे नऊ कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी चार गमावले आहेत. तर पाच सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताला येथे प्रथमच कसोटी जिंकण्याची संधी असेल. भारताने यापूर्वी १९८६ इंग्लंडमध्ये दोन कसोटी सामने जिंकले होते आणि २-० ने मालिका जिंकण्यात यश मिळवले होते. इंग्लंडमध्ये भारत कसोटी मालिका जिंकण्याची ही तिसरी वेळ असेल. यापूर्वी त्यांनी १९७१ मध्ये १-०, १९८६ मध्ये २-० ने विजय मिळवला होता.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना १० सप्टेंबरपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाईल. भारतीय संघ सध्याच्या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे आणि इंग्लंड संघाने पाचवा सामना जिंकला तरी मालिका त्यांच्या हातात राहणार नाही आणि सामना बरोबरीत सुटेल. तर, ज्या फॉर्ममध्ये टीम इंडिया दिसत आहे, ते बघून असे समजण्यात येते कि यात टीम इंडियाचे पारडे जड दिसते.

- Advertisement -

भारत या कसोटीत काही बदल करू शकतो ज्यामुळे सलग चार कसोटी सामने खेळणाऱ्या जसप्रीत बुमराहला विश्रांती घ्यावी लागेल. यानंतर त्याला आयपीएल आणि टी -२० विश्वचषकातही भाग घ्यावा लागणार आहे. मात्र, अंतिम कसोटीचे महत्त्व लक्षात घेता त्याला खेळवले जाऊ शकते. भारत अजिंक्य रहाणेलाही विश्रांती देऊ शकतो, मयंक अग्रवाल किंवा सूर्यकुमार यादवला त्याच्या जागी संधी मिळू शकते. तर पुन्हा एकदा, सलामीच्या जोडीवर जबाबदारी असेल, रोहित शर्मा लोकेश राहुलने चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात पहिल्या विकेटसाठी ८३ धावा जोडल्या. त्याच्या कामगिरीच्या आधारे भारताने दुसऱ्या डावात ४६६ धावा केल्या होत्या आणि ३६७ धावांची आघाडी घेतली होती. भारतचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनला शेवटच्या सामन्यात खेळवणार कि नाही हे पहावे लागेल. इंग्लंड संघाचा उपकर्णधार यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर संघात परतणार असे दिसून येते. इंग्लंडसंघ कदाचित गोलंदाजीत काही बदल करू शकतो.

भारत: के एल राहुल, रोहीत शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा.

- Advertisement -

इंग्लंड: रोरी बर्न्स, हसीब हमीद ,जो रूट (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, सॅम करेन, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, डेव्हिड मलान, क्रेग ओव्हरटन, ओली पोप, जेम्स अँडरसन, ऑली रॉबिन्सन, ख्रिस वोक्स, मार्क वूड


हेही वाचा : IND VS SA TOUR 2021-22 : टीम इंडियाच्या साऊथ आफ्रिका दौऱ्याची घोषणा

ICC T20I WORLD CUP 2021 : धोनी विरोधात “बीसीसीआय” कडे तक्रार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -