घर क्रीडा टीम इंडिया 10 व्यांदा खेळणार आशिया कपची फायनल; अंतिम सामन्यासाठी श्रीलंकेपुढे अडचणी

टीम इंडिया 10 व्यांदा खेळणार आशिया कपची फायनल; अंतिम सामन्यासाठी श्रीलंकेपुढे अडचणी

Subscribe

आधी पाकिस्तानला लोळवत भारतीय संघाने 12 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला.

नवी दिल्ली : भारतीय संघाने श्रीलंकेला हरवत आशिया कपची अंतिम फेरी गाठली आहे. टीम इंडियाने दहाव्या वेळी ही कामगिरी केली असून, आता अंतिम सामना कोणासोबत होणार हे अद्याप निश्चित नसून, श्रीलंका आणि पाकिस्तानच्या लढतीनंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे.(Team India will play the final of the Asia Cup for the 10th time Difficulties ahead for Sri Lanka for the final match)

आधी पाकिस्तानला लोळवत भारतीय संघाने 12 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. या विजयानंतर भारतीय संघ आता आशिया कपच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून, आता पाकिस्तान आणि श्रीलंकेतील सामन्यानंतर भारताला अंतिम फेरीत कोण टशन देणार हे कळणार आहे. तत्पूर्वी भारताची लढत आता 15 सप्टेंबर रोजी बांगलादेशसोबत होणार आहे.

श्रीलंकेविरुद्ध विजय रोमहर्षक

- Advertisement -

भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या सुपर 4 सामन्यात भारतीय संघाने दमदार गोलंदाजी करत श्रीलंकेवर विजय मिळवला. या विजयाने भारतीय संघाने श्रीलंकेचा विजयरथ रोखला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 213 धावा केल्या होत्या. भारतीय संघ ऑल आऊट झाल्यानंतर श्रीलंका सहज विजय मिळवेल असे वाटत असतानाच भारतीय गोलंदाजांमधील कुलदीप यादवची फिरकी आणि जसप्रीत बुमराहच्या वेगवान गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा संपूर्ण संघ 172 धावांच करू शकला. भारताने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली.

हेही वाचा : शेतकऱ्यांना अनन्यसाधारण शक्तीचे वरदान, त्यांच्या संवर्धनाची गरज- राष्ट्रपती मुर्मू

सहा वेळा जिंकला भारताने आशिया कप

- Advertisement -

भारतीय संघाने 2011 विश्वकप जिंकल्याचे सर्वश्रृत आहे. पण त्याचबरोबर भारतीय संघाने तब्बल सहा वेळा आशिया कप जिंकलेला आहे. भारतीय संघ 2023 च्या आशिया कपाच्या अंतिम फेरीत सातव्यांदा दाखल झाला आहे. तेव्हा भारतीय संघ सातव्यांदा आशिया कप जिंकतो का हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या लंडनमधील घरांच्या चाव्या अजय अशरांकडे असतील…; राऊतांचा शिंदेंना टोला

नॉकआऊट सामन्यात पाऊस पडला तर काय होणार?

श्रीलंकेतील कोलंबोमध्ये पाऊस हा सर्वात मोठी अडचण आणत आहे. अंतिम फेरीत जाणार्‍या संघासाठी बाद फेरीत पाऊस पडला आणि सामन्याचा निकाल कळला नाही तर काय होईल? अशा स्थितीत पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. आणि श्रीलंका संघ अंतिम फेरीत पोहोचेल, सामना रद्द झाल्यास, 1-1 गुणांचे वाटप केले जाईल आणि त्यानंतर अंतिम फेरीत जाणारा संघ निव्वळ धावगतीच्या आधारावर ठरवला जाणार आहे.

- Advertisment -