घरक्रीडादोन सामने जिंकणाऱ्या भारताचा झिम्बाब्वेबरोबर रंगणार तिसरा सामना, कधी होणार?

दोन सामने जिंकणाऱ्या भारताचा झिम्बाब्वेबरोबर रंगणार तिसरा सामना, कधी होणार?

Subscribe

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात दोन एकदिवसीय सामने रंगले. यामध्ये भारतीय संघाने तब्बल दोन सामन्यात झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवला आहे. या मालिकेतील तिसरा सामना २२ ऑगस्ट रोजी हेरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात झिब्बावेच्या संघाला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच तिसऱ्या सामन्यात भारतीय संघातून नव्या खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने दहा विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारताचा कर्णधार केएल राहुलच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दुसऱ्या सामन्यात केएल राहुलला खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात केएल राहुल काय कामगिरी करतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

भारतीय वेळेनुसार, या सामन्याला दुपारी १२.४५ वाजता सुरूवात करण्यात येणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह प्रसारण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर करण्यात येणार आहे.

असे असतील दोन्ही संघ –

भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाझ अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान.

- Advertisement -

झिम्बाब्वे संघ: रेगीस चकाब्वा (कर्णधार), रायन बुर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, इनोसंट काया, ताकूदझ्वँनशी केईतानो, क्लाईव्ह मडांडे (यष्टीरक्षक), वेस्ली मॅदवेर, तदीवांशे मरुमानी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगो, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरीपानो,रिचर्ड येनगारावा, व्हिक्टर एनवायुची, सिकंदर रझा.


हेही वाचा : सलग दुसऱ्या सामन्यात भारताची झिम्बाब्वेवर मात, तिसऱ्या वनडेची औपचारिकता


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -