Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND VS SA TOUR 2021-22 : टीम इंडियाच्या साऊथ आफ्रिका दौऱ्याची घोषणा

IND VS SA TOUR 2021-22 : टीम इंडियाच्या साऊथ आफ्रिका दौऱ्याची घोषणा

Related Story

- Advertisement -

टीम इंडियाच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकातून सूट मिळणार नाही. टीमला डिसेंबर-जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत एकूण दहा सामने खेळायचे आहेत. यात तीन कसोटी सामन्यांचाही समावेश आहे. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी स्पर्धेचा भाग आहे. दोन्ही देशांमधील शेवटची द्विपक्षीय मालिका गेल्या वर्षी मार्चमध्ये झाली होती. भारतात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांची वनडे मालिका कोरोनामुळे एका सामन्यानंतर स्थगित करण्यात आली होती.

टीम इंडियाला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पुन्हा दक्षिण आफ्रिकेत टी -२० मालिका खेळण्यासाठी जायचे होते. पण ऑगस्टमध्ये कोरोनामुळे मालिका होऊ शकली नाही. नंतर आयपीएलच्या वेळापत्रकातील बदलांमुळे मालिका खेळता आली नाही. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सांगितले की, तीन कसोटी व्यतिरिक्त भारताचा संघ तीन एकदिवसीय आणि चार टी -२० सामने खेळेल. मात्र, सामने खेळण्याचे ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

17 डिसेंबरपासून मालिका सुरू होईल

- Advertisement -

मालिकेची सुरुवात प्रथम कसोटी सामन्याने होईल. पहिली कसोटी १७ ते २१ डिसेंबर, दुसरी कसोटी २६ ते ३० डिसेंबर तर तिसरी कसोटी ३ ते ७ जानेवारी दरम्यान खेळली जाईल. त्याचबरोबर ११ जानेवारी, १४ जानेवारी आणि १६ जानेवारी रोजी तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. दुसरीकडे, पुढील चार टी -२० सामने हे १९, २१, २३ आणि २६ जानेवारी रोजी सामने खेळले जातील.

दक्षिण आफ्रिकेत विजय नाही

टीम इंडियाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेली नाही. आतापर्यंत दोन्ही संघात सात कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने सहा मालिका जिंकल्या आहेत, तर एक मालिका अनिर्णित राहिली आहे. १९९२-९३ मध्ये खेळलेल्या चार सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-0 ने विजय मिळवला. १९९६-९७ मध्ये २-०, २००१-२००२ मध्ये १-०, २००६-०७ मध्ये २-१, २०१३-०१४ मध्ये १-० आणि शेवटी २०१७-०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका २-१ ने जिंकली. २०१०-०११ मध्ये खेळलेली तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत होती. अशा परिस्थितीत विराट कोहलीला इथेही मालिका जिंकण्याचे लक्ष घेउन उतरावे लागेल.


- Advertisement -

हेही वाचा : ICC T20I WORLD CUP 2021 : धोनी विरोधात “बीसीसीआय” कडे तक्रार

ENG VS IND 5TH TEST : भारतीय संघाला मोठा धक्का, आणखी एकाला कोरोनाची लागण

 

- Advertisement -