घरक्रीडाटीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा रद्द

टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा रद्द

Subscribe

करोनामुळे श्रीलंका दौराही अनिश्चित काळासाठी स्थगित

भारतीय क्रिकेट संघाचा जून-जुलैमध्ये होणारा श्रीलंका दौरा तूर्तास रद्द करण्यात आल्याची घोषणा गुरुवारी श्रीलंका क्रिकेटने केली होती. त्यापाठोपाठ शुक्रवारी टीम इंडियाचा ऑगस्टमध्ये होणारा झिम्बाब्वे दौराही रद्द करण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन असल्याने भारतात सर्वप्रकारचे क्रिकेट बंद होते. भारताच्या खेळाडूंना घरातच बसून राहावे लागत होते. त्यांना मैदानात जाऊन सराव करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अजूनही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे बीसीसीआयने भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

करोनाचा धोका लक्षात घेऊन भारतीय संघाचा श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौरा रद्द करण्यात आला आहे. टीम इंडिया श्रीलंकेत २४ जूनपासून तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार होती. त्यानंतर २२ जूनपासून ते झिम्बाब्वेमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार होते. परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ या दोन्ही दौर्‍यांवर जाणार नाही, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले. परंतु, भारतीय संघ ऑगस्टमध्ये श्रीलंकेच्या दौर्‍यावर जाऊ शकेल अशी माहिती श्रीलंकेतील एका वृत्तपत्राने दिली होती. त्यामुळे विराट कोहलीचा संघ पुन्हा मैदानात कधी उतरणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

करोनामुळे भारतात ८५०० हून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे बीसीसीआयने खेळाडूंना मैदानात जाऊन सराव करण्यासाठी परवानगी दिलेली नाही आणि सराव शिबीर जुलैच्या आधी सुरु होण्याची शक्यता कमीच आहे. खेळाडूंना सामने खेळण्याआधी फिट होण्यासाठी सहा आठवडे लागू शकतील असे प्रशिक्षकांचे म्हणणे आहे. परंतु, सराव शिबीर घेणे पूर्णपणे सुरक्षित आहे हे पटल्याशिवाय बीसीसीआय खेळाडूंना बाहेर सराव करण्यास परवानगी देणार नाही असे जय शाह यांनी स्पष्ट केले.

बाहेर सराव करणे पूर्णपणे सुरक्षित आहे याची खात्री पटल्याशिवाय बीसीसीआय खेळाडूंचे शिबीर भरवणार नाही. आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेट पुन्हा सुरु व्हावे यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. परंतु, आम्ही घाईने निर्णय घेऊन केंद्र आणि राज्य सरकार, तसेच इतर संघटनांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरू देणार नाही. बीसीसीआय बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे जय शाह म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -