घरक्रीडातीसऱ्या कसोटीसाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा; रोहित सलामीला येणार?

तीसऱ्या कसोटीसाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा; रोहित सलामीला येणार?

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तीसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सीडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरुवात होणार आहे. यासाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. तीसऱ्या कसोटी सामन्यात सलामीला येणार आहे. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्माला उपकर्णधार करण्यात आला आहे. अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सीडनी क्रिकेट ग्राऊंडवर ४३ वर्षानंतर कसोटीत विजय मिळवण्याची संधी आहे. दरम्यान, या सामन्यात नवदीप सैनी कसोटी क्रिकेटमधअये पदार्पण करणार आहे.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. अॅडिलेडच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या पराभवाचा वचपा काढत दुसरी कसोटी मालिका भारताने जिंकली. तिसऱ्या कोसटीत विजय मिळवून माहलिकेत आघाडी घेण्याचं भारताचं लक्ष्य असणार आहे. दरम्यान, रोहित शर्मा संघात आल्याने भारत अधिक मजबुत झाला आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिका, तसेच कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत खेळू शकला नव्हता.

- Advertisement -

भारतीय संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शुबमन गील, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा, रविश्चंद्रन आश्वीन, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सीराज, नवदीप सैनी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -