घरक्रीडासचिन २००७ मध्ये निवृत्तीच्या तयारीत होता

सचिन २००७ मध्ये निवृत्तीच्या तयारीत होता

Subscribe

गॅरी कर्स्टन यांचे उद्गार

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या तयारीत होता. कारण त्याला खेळातून आनंद मिळत नव्हता, असे भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी सांगितले. कर्स्टन यांची २००८ मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक झाली. त्याआधी २००७ साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाला बाद फेरीही गाठता आली नव्हती. त्यातच सचिनला सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळत नव्हती. त्यामुळेच तो निवृत्ती घेण्यास तयार होता.

मी सचिनसोबत प्रशिक्षक म्हणून बरीच वर्षे काम केले. परंतु, मी पहिल्यांदा जेव्हा भारतात दाखल झालो होतो, तेव्हा तो निवृत्त होण्याच्या तयारीत होता. त्याच्या मते, त्याला योग्य क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळत नव्हती. त्याला खेळातून अजिबातच आनंद मिळत नव्हता, असे कर्स्टन यांनी सांगितले. कर्स्टन यांच्या मार्गदर्शनात भारताने २०११ विश्वचषक जिंकला आणि या विश्व विजयात सचिनने महत्त्वाची भूमिका बजावली.

- Advertisement -

कर्स्टन प्रशिक्षक असताना सचिनने ३८ एकदिवसीय सामन्यांत ७ शतकांच्या मदतीने १९५८ धावा, तर ३१ कसोटी सामन्यांत १२ शतकांच्या मदतीने २९१० धावा चोपून काढल्या. याबाबत कर्स्टन म्हणाले की, मी प्रशिक्षक झाल्यावर सचिनने तीन वर्षांत १८-१९ शतके केली. त्याला ज्या क्रमांकावर फलंदाजी करायची होती, तिथे त्याने केली आणि आम्ही विश्वचषक जिंकलो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -