घरक्रीडाचार महिन्यात २६ किलो वजन घटवलं; सानिया मिर्झाचं जबरदस्त कमबॅक

चार महिन्यात २६ किलो वजन घटवलं; सानिया मिर्झाचं जबरदस्त कमबॅक

Subscribe

सानियाच्या तब्बल दोन वर्षांच्या कमबॅक नंतर सानियाने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. सानियाने अवघ्या चार महिन्यांमध्ये तब्बल २६ किलो वजन कमी केल आहे.

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आता पुन्हा एकदा नव्या जोशात टेनिस कोर्टवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सानिया वर्षभरापूर्वी गरोदर असल्याने ती आपल्या खेळापासून दूर होती. सानियाच्या तब्बल दोन वर्षांच्या कमबॅक नंतर सानियाने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. सानियाने अवघ्या चार महिन्यांमध्ये तब्बल २६ किलो वजन कमी केले आहे. दोन वर्षांपासून टेनिस कोर्टपासून दूर असताना, आता पुन्हा नव्याने आपले ध्येय गाठण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे तिने सांगितले आहे.

- Advertisement -

 

सानियाच्या कमबॅक नंतर तिने सोशल मीडियावर ‘दोन वर्षांपूर्वीची ती आणि आताची ती’, असे दोन फोटो शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करताना आपले ध्येय गाठण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो आणि कायम ध्येय निश्चित असणे किती महत्वाचे आहे हे सांगितले आहे. यासाठी कॅप्शन देताना ती म्हणाली, “आपले एक ध्येय असते, रोजचे ध्येय आणि दिर्घकालीन ध्येय त्यामुळे आपल्याला त्यावर अभिमान असणे आवश्यक आहे. मला बाळ झाल्यानंतर पुन्हा माझे ध्येय गाठण्यासाठी मला चार महिन्यांचा कालावधी लागला. पण अनेकांना असं वाटते की यासाठी मला खूप वेळ लागला परंतु जर आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर कितीही अडचणी आल्या तरीही आपण ते साध्य करतो. आपल्या स्वप्नांचा आपण पाठलाग करायला हवा, कोणीही सांगितले की हे शक्य नाही तरीही त्याने काही फरक पडत नाही. मी या चार महीन्यात ८९ किलो पासून ६३ किलो पर्यंत वजन कमी केले आहे. जर मी हे करू शकते तर कुणीही हे करू शकतं”. अशा पद्धतीने तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

सानियाच्या या जिद्दीला सलाम करत अनेकांनी सोशल मीडियावरून तिचे कौतुक केले आहे. सानियाला यासाठी काय-काय करावे लागले, तसेच यासाठी तिने कोण – कोणता व्यायाम केला याचे व्हिडिओ तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -