घरक्रीडाथायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा

थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा

Subscribe

भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांना थायलंड ओपन स्पर्धेच्या दुसर्‍याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागेल आहे. सायनाला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी फारशी मेहनत करावी लागणार नाही असे म्हटले जात होते. पण दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणार्‍याला सायनाला या स्पर्धेत केवळ एक सामना जिंकता आला. साई प्रणितने मात्र भारताच्याच शुभांकर डेवर २१-१८, २१-१९ अशी सरळ गेममध्ये मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचा या फेरीत जपानच्या कांटा त्सुनेयामाशी सामना होईल.

सातव्या सीडेड सायनाला दुसर्‍या फेरीत जपानच्या बिनसीडेड सयाका ताकाहाशीने २१-१६, ११-२१, १४-२१ असे पराभूत केले. सायनाने अपेक्षेनुसार या सामन्याची चांगली सुरुवात करत पहिला गेम २१-११ असा मोठ्या फरकाने जिंकला. मात्र, दुसर्‍या आणि तिसर्‍या गेममध्ये तिने बर्‍याच चुका केल्याने तिचा पराभव झाला.

- Advertisement -

पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत श्रीकांतचा थायलंडच्या खोशीत फेटप्रदाबने २१-११, १६-२१, १२-२१ असा पराभव केला. पारुपल्ली कश्यपलाही पराभवाचा सामना करावा लागला. त्याला तिसर्‍या सीडेड चोऊ टीन चेन याने २१-१९, २१-१४ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. मिश्र दुहेरीत भारताच्या प्रणव जेरी चोप्रा-सिक्की रेड्डीवर हाँगकाँगच्या टँग चेन मॅन-यिंग सुएत या जोडीने १६-२१, ११-२१ अशी मात केली.

सात्विकसाईराज-चिरागची आगेकूच

- Advertisement -

थायलंड ओपन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताची जोडी सात्विकसाईराज रणकिरेड्डी-चिराग शेट्टीने इंडोनेशियाची जोडी फजर अल्फीन-मुहम्मद आर्डीआंटो यांना २१-१७, २१-१९ अशी धूळ चारत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. सात्विकसाईराजने मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पाच्या साथीने खेळताना इंडोनेशियाच्या अल्फीन प्रास्तेया-इस्लामी या जोडीवर २१-१८, २१-१९ अशी मात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -