घरक्रीडाथायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा

थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा

Subscribe

थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या सात्विकराज रणकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत सोळाव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीने कोरियन प्रतिस्पर्ध्यांवर २२-२०, २२-२४, २१-९ अशी मात केली. अंतिम फेरीत भारतीय जोडीसमोर तिसर्‍या मानांकित ली जुन हुई आणि ल्यू यु चेन या चिनी जोडीचे आव्हान असणार आहे. २०१८ साली सात्विकराज आणि चिराग शेट्टी जोडीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदक पटकावले होते. त्यानंतर एखाद्या मोठ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची भारतीय जोडीची ही पहिलीच वेळ आहे.

पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत कोरियन जोडी ११-१० अशी आघाडी होती. सुरूवातीला पहिल्या सेटमध्ये कोरियन जोडीने आक्रमक सुरुवात केली, ३-० ने आघाडी घेत कोरियाच्या को संग ह्युन आणि शिन बाएक चिओल जोडीने भारतीय जोडीला बॅकफूटला ढकलले. मात्र, मध्यांतरानंतर भारतीय जोडीने दमदार पुनरागमन करत कोरियन जोडीला धक्का दिला. अखेरच्या मिनिटांमध्ये कोरियन जोडीने दोन ब्रेक पॉईंट मिळवत सामना बरोबरीत नेला.

- Advertisement -

मात्र सात्विकराज आणि चिरागने आपला अनुभव पणाला लावत पहिला सेट खिशात घातला. दुसरा सेट देखील अटीतटीचा झाला.यावेळी मात्र कोरियन खेळाडूंनी भारतीय खेळाडूंची झुंज मोडून काढत २२-२४ ने बाजी मारली. तिसर्‍या सेटमध्ये मात्र भारतीय जोडीने कोरियन जोडीला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. २१-९ च्या फरकाने सेट जिंकत भारतीय जोडीने सामनाही जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -