घरक्रीडाThand Rakh : विराट-गंभीर वादावर युवराज सिंगने मजेशीर अंदाजात दिला सल्ला

Thand Rakh : विराट-गंभीर वादावर युवराज सिंगने मजेशीर अंदाजात दिला सल्ला

Subscribe

नवी दिल्ली : आयपीएलच्या 2023 (IPL 2023) मध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातील वादामुळे चांगलाच चर्चेत आला. या वादानंतर माजी क्रिकेटर, चाहते आपआपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यात आता भारताचा माजी फलंदाज युवराज सिंहने (Yuvraj singh) ट्विटरच्या माध्यमातून विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीरला (Gautam Gambhir) मजेशीर अंदाजात राग शांत करण्याचा सल्ला दिला आहे.

16 व्या हंगामातील 43 वा लखनऊ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. या सामन्यातील लखनऊ जायंट्स संघाच्या डावातील 17व्या षटकात विराट स्टंपच्या मागून धावत आला आणि त्याने नवीनला काहीतरी इशारा केल्यानंतर या दोघांमध्ये वादाला सुरूवात झाली आणि या वादाचा शेवट विराट आणि गौतम यांच्यापर्यंत पोहचवला. प्रकरण वाढत असल्याचे पाहिल्यावर दोन्ही संघांचे सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंनी विराट आणि गंभीरला वेगळे केल्यानंतर प्रकरण शांत केले.

- Advertisement -

विराट आणि गंभीरमधील वादानंतर माजी दिग्गज सुनील गावस्कर आणि विरेंद्र सेहवागने या दोघांना फटकारले आहे. ते म्हणाले की, असे करून तुम्ही तुमच्या चाहत्यांशी खेळत आहात. तर दुसरीकडे युवराज सिंगने ट्वीट केले आहे जे सद्या  व्हायरल होत आहे. युवराजने मजेशीर अंदाजात दोघांनाही शांत होण्याचा सल्ला दिला आहे. युवराजने ट्विटरवर म्हटले की, ‘मला वाटते की स्प्राइटने गौती आणि चीकूला त्यांच्या ‘Thand Rakh’ मोहिमेसाठी साइन करावे, मित्रांनो तुम्हाला काय  वाटते? हे ट्वीट करताना युवराजने विराट आणि गंभीरला टॅग केले आहे. युवराजचे ट्वीट पाहिले तर त्याने दोघांनाही भांडणाला गांभीर्याने न घेण्याचा सल्ला दिला आहे. युवराजच्या या ट्वीटवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, 2011 च्या विश्वचषकादरम्यान विराट, गंभीर आणि युवराज भारतीय संघाचा भाग होते. एवढेच नाही तर एकदा गंभीरने त्याला मिळालेला सामनावीराचा पुरस्कार विराटला दिला होता. पण आयपीएलमध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकांविरुद्ध खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून दोघेही एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -