घरक्रीडाठाणे महानगरपालिकेला जेतेपद

ठाणे महानगरपालिकेला जेतेपद

Subscribe

ठाणे जिल्हा निवड चाचणी कबड्डी

ठाणे महानगरपालिकेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पुरुष व्यावसायिक गटाचे जेतेपद पटकावले. तसेच प्रथम श्रेणी पुरुषांत मोरया क्रीडा मंडळ, महिलांत रा. फ. नाईक आणि द्वितीय श्रेणी पुरुषांत चेरोबा क्रीडा मंडळाने अजिंक्यपद मिळवले.

ठाण्याच्या स्व. अनिल शंकर जाधव क्रीडांगणावर संपन्न झालेल्या या स्पर्धेतील व्यावसायिक पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात ठाणे महानगरपालिकेने नवी मुंबई महानगरपालिकेला ३९-२१ असे पराभूत केले. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच ठाणे महानगरपालिकेने चांगला खेळ केला. त्यामुळे सामन्याच्या मध्यंतराला त्यांच्याकडे १५-१३ अशी आघाडी होती. त्यांनी उत्तरार्धातही दमदार खेळ करत हा सामना ३९-२१ असा तब्बल १८ गुणांच्या फरकाने जिंकला. त्यांच्या या विजयात परेश हरड, अक्षय भोईर हे खेळाडू चमकले.

- Advertisement -

प्रथम श्रेणी पुरुषांत सोनाळेच्या मोरया क्रीडा मंडळाने कल्याणच्या शिवशंकर क्रीडा मंडळाचा प्रतिकार ३६-३२ असा मोडून काढत विजेतेपदावर प्रथमच आपले नाव कोरले. निलेश साळुंखे, अ‍ॅलन डिसूझा यांनी आक्रमक सुरुवात करत शिवशंकरला पहिल्या डावात १५-१३ अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र, दुसर्‍या डावात परेश हरड, अजय पाटील यांनी आपला खेळ उंचवला. त्यामुळे मोरया मंडळाने हा सामना ४ गुणांनी जिंकला. महिलांच्या अंतिम सामन्यात रा.फ.नाईक संघाने शिवतेज क्रीडा मंडळाला ३४-३३ नमवले. दर्शना सणस, छाया कोळी यांनी अप्रतिम खेळ करत रा.फ.नाईक संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -