सिंधुदुर्ग (तेजस्वी काळसेकर) : सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यानंतर तीने ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अक्वॅटिक चॅम्पियनशिप 2023 जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सातवा नंबर पटकावताना राष्ट्रीय स्तरावर पहिल्या आठमध्ये येण्याचा मान मिळवला आहे. (The birth of Konkans mermaids at the national level Now the national competition will be played)
हेही वाचा – Ireland Vs India T20 : हाऊसफुल्ल! भारतीय संघामुळे आयर्लंड क्रिकेट बोर्ड फायद्यात
महाराष्ट्र राज्य जलतरण असोसिएशन यांच्यामार्फत नुकतीच पुणे येथे राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली. त्यात पुणे बालेवाडी येथे बालाजी केंद्रे यांच्या कडून जलतरणचे प्रशिक्षण घेत असलेली पूर्वांची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठो निवड झाली. या निवडीसाठो महाराष्ट्र राज्य जलतरण फेडरेशनचे सचिव राजू पालकर, अजय फाटक, कैलास आखाडे यांनी विशेष प्रयत्न केले.
पूर्वांची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत निवड झाल्यानंतर ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे सुरु असलेल्या 39 व्या सब ज्युनियर व जयुनियर राष्ट्रीय अक्वॅटिक चॅम्पिायनशिप 2023 या स्पर्धेत तीने 1500 मीटर फ्री स्टाईल प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत 19 मुलीमधून तीने सातवा क्रमांक पटकवला व राष्ट्रीय स्तरावर पहिल्या आठ जणांमध्ये येण्याचा मान मिळविला आहे.
हेही वाचा – Asia Cup 2023: आशिया कपपूर्वी भारताला मोठा दिलासा; राहुल-श्रेयस परतणार ?
पूर्वाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. ती पाच वर्षाची असल्यापासून सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावामध्ये प्रशिक्षक प्रवीण सुलोकार वेगुर्ला येथील प्रशिक्षक दीपक सावंत यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिची पुणे बालेवाडी येथे जलतरण प्रशिक्षणासाठो निवड झाली. त्याठिकाणी प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्याकडून प्रशिक्षण घेत असून तिच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.