Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाChampions Trophy Final : आज चॅम्पियन्सचा महामुकाबला! दुबईत रंगणार भारत-न्यूझीलंड फायनल

Champions Trophy Final : आज चॅम्पियन्सचा महामुकाबला! दुबईत रंगणार भारत-न्यूझीलंड फायनल

Subscribe

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची फायनल आज (9 मार्च) दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या संघात हा महामुकाबला रंगणार आहे.

दुबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची फायनल आज (9 मार्च) दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या संघात हा महामुकाबला रंगणार आहे. भारतीय संघाने या संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला नमवून फायनलमध्ये धडकलेला न्यूझीलंडचा संघही जबरदस्त फॉर्ममध्ये आलाय. तरीही सलग तिसर्‍यांदा आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करणार्‍या टीम इंडियाचे पारडे जड मानले जात आहे. ही रोमांचकारी फायनल बघण्यासाठी भारतीय क्रिकेट फॅन्स कमालीचे आतुर झाले आहेत. (The Champions Trophy final between India and New Zealand will be held at the Dubai International Cricket Stadium)

भारताने आतापर्यंत स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता तशी कमीच आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, के. एल. राहुल यांनी वेगवेगळ्या मॅचमध्ये धडाकेबाज बॅटिंग करून भारताला विजय मिळवून दिला आहे. फक्त चांगली सुरुवात करून बाद होणार्‍या रोहित शर्माचा फॉर्मच चिंतेचा विषय आहे. त्याशिवाय अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती यांच्या फिरकीसह मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्याची बॉलिंग फॉर्मात आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यादरम्यान न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीला दुखापत झाली आहे. तरीही केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल भारताची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Rohit Sharma : चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा कर्णधारपद सोडणार? क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण 

भारतीय संघाने ग्रुप स्टेजमध्ये आधी बांगलादेश आणि नंतर पाकिस्तानला पराभूत करीत उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले होते. त्यानंतर शेवटच्या साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही हरवले. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून टीम इंडियाने वर्ल्डकप फायनलचे उट्टे काढले. आता अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारताला पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याची संधी आहे.

सामन्याची वेळ : रविवार दुपारी 2.30 वाजता
स्थळ : दुबई, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

हेही वाचा – Jonty Rhodes Video : वय 55, पण जॉन्टी ऱ्होड्सची फिल्डिंग अजुनही कमाल; ती झेप अन् क्रिकेटप्रेमींची चर्चा

अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.

न्यूझीलंड संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, जेकब डफी.


Edited By Rohit Patil