घरक्रीडाTOKYO OLYMPIC 2020 : गोल्डन बॉय झाला TATA AIAचा ब्रँड ॲम्बेसेडर

TOKYO OLYMPIC 2020 : गोल्डन बॉय झाला TATA AIAचा ब्रँड ॲम्बेसेडर

Subscribe

टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सने नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला त्यांचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. बुधवारी कंपनीने सांगितले की, पुढील काही वर्षांसाठी नीरज चोप्रासोबत हा करार करण्यात आला आहे. आता सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या जीवन संरक्षण आणि आरोग्य आणि निरोगी उत्पादनांना प्रोत्साहन देईल.

नीरज चोप्रा यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केल्यानंतर, कंपनीने सांगितले की सध्याच्या कोविड -१९ महामारीमुळे जीवन आणि आरोग्य विम्याची गरज आणखी वाढली आहे. टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य वितरण अधिकारी वेंकी अय्यर यांनी सांगितले की, भारतातील जीडीपीच्या केवळ ३.५ टक्के विमा प्रीमियमद्वारे संरक्षित आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात प्रचंड शक्यता आहेत.

- Advertisement -

नीरज चोप्रा म्हणाला की, त्याला दुसऱ्या ब्रँडसोबत करार करायला काहीच हरकत नाही. खेळाडूची कारकीर्द लहान असते. अशा परिस्थितीत जर ऑफर इतर कोणत्याही कंपनीकडून आली तर ती स्वीकारण्यास मला काहीच हरकत नाही.

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. २३ वर्षीय नीरज चोप्रा ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत भारतासाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला आणि वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू आहे. नीरजच्या आधी नेमबाज अभिनव बिंद्राने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

- Advertisement -

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा देशातील क्रीडा विश्वाचा नवा पोस्टर बॉय बनला आहे. काही अहवालांमध्ये असा दावा केला जात आहे की, यामुळे त्यांच्या जाहिरात शुल्कात एक हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे.


हेही वाचा : ICC T20I WORLD CUP 2021 : ओमानसाठी ऐतिहासिक क्षण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -