घरक्रीडादिल्ली कॅपिटल्सवरचं संकट दूर, बलाढ्य खेळाडू परतल्याने दिलासा

दिल्ली कॅपिटल्सवरचं संकट दूर, बलाढ्य खेळाडू परतल्याने दिलासा

Subscribe

दक्षिण आफ्रिकेच्या या झंझावाती गोलंदाजाने गेल्या मोसमात दमदार कामगिरी केली आणि 8 सामन्यात 12 विकेट घेतल्या, त्यानंतर फ्रँचायझीने त्याला 6.5 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. फ्रँचायझीने त्याला कागिसो रबाडासारख्या धडाकेबाज वेगवान गोलंदाजापेक्षा प्राधान्य दिले.

आयपीएल 2022 हंगामाच्या सुरुवातीला अनेक परदेशी खेळाडूंची उपलब्धता ही संघांसाठी एक समस्या बनलीय. ऑस्ट्रेलिया-इंग्लंडसह अनेक संघांचे खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीत. दिल्ली कॅपिटल्सलाही इतर संघांप्रमाणेच या समस्येचा सामना करावा लागणार आहे. एवढे सगळे होऊनही ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघासाठी सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. सर्व अटकळ आणि शंका दूर करत दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्खिया ​​नवीन हंगामासाठी उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे तो मुंबईत पोहोचला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या या झंझावाती गोलंदाजाने गेल्या मोसमात दमदार कामगिरी केली आणि 8 सामन्यात 12 विकेट घेतल्या, त्यानंतर फ्रँचायझीने त्याला 6.5 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. फ्रँचायझीने त्याला कागिसो रबाडासारख्या धडाकेबाज वेगवान गोलंदाजापेक्षा प्राधान्य दिले. मात्र, नॉर्खियाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याच्या खेळावर शंका उपस्थित केली जात होती. दुखापतीमुळे तो गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून मैदानाबाहेर होता आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून एकही सामना खेळू शकला नव्हता.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिकेच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करूनही नॉर्खिया पूर्णतः बरा होऊ शकलेला नाही. तेव्हापासून अशी भीती होती की, तो आयपीएल 2022 सीझनला मुकणार आहे आणि अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्ससाठी हा एक मोठा झटका ठरेल, कारण त्याच्या संघातील सर्वात वेगवान गोलंदाज नोर्खिया ​​आहे आणि गेल्या दोन हंगामात त्याची कामगिरी खूप चांगली होती.

मात्र, खुद्द नॉर्खियाने अनेकांची भीती दूर केली. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करून दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांना सांगितले की, तो आयपीएल 2022 मध्ये भाग घेण्यासाठी मुंबईला पोहोचत आहे. यामुळे दिल्ली कॅपिटल्स आणि त्याच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असूनही नॉर्खिया सुरुवातीच्या सामन्यांपासूनच खेळण्यासाठी उपलब्ध असेल की नाही हे अद्याप पूर्णतः ठरलेले नाही.

- Advertisement -

इनसाइड स्पोर्टच्या वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्सच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच नॉर्खियाला क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून आयपीएलमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. नॉर्खियाने गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकापासून गोलंदाजी केलेली नाही आणि अशा परिस्थितीत त्याच्या फिटनेस आणि मॅच फिटनेसवर संघाचे बारकाईने लक्ष असेल. 27 मार्च रोजी दिल्लीला आपला पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचा आहे.


हेही वाचाः ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर Glenn Maxwell भारताच्या Vini Raman सोबत विवाहबद्ध

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -