घरक्रीडा'द ग्रेट खली'च्या आईचे निधन, १५ दिवस सुरु होते उपचार

‘द ग्रेट खली’च्या आईचे निधन, १५ दिवस सुरु होते उपचार

Subscribe

खलीच्या आई टांडी देवी या गेल्या अनेक दिवसांपासून फुफ्फुसांच्या आजाराने ग्रस्त होत्या.

दलीप सिंह (Dalip Singh) म्हणजेच WWE सुपरस्टार ‘द ग्रेट खली’ यांची आई टांडी देवी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले टांडी देवी या ७९ वर्षांच्या होत्या. गेल्या १५ दिवसांपासून  त्यांच्या उपचार सुरु होते.  ( The Great Khali Mother Tandi Devi dies, treatment begins in 15 days) त्याच्यांवर लुधियाना येथील दयानंद मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांनी औषधांना उपचार देणे थांबले आणि रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खलीच्या आई टांडी देवी या गेल्या अनेक दिवसांपासून फुफ्फुसांच्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांना १४ जून रोजी डीएमसी पीआरमध्ये भर्ती करण्यात आले. त्यांचा कोरोना रिपोर्टही निगेट्विह आला होता. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

खलीच्या आई टांडी देवी यांच्यावर आज, सोमवारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. टांडी देवी यांचे मल्टीपल ऑर्गन फेल झाल्यामुळे त्यांच्या मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. आई गेल्याने द ग्रेट खलीवर शोककला पसरली आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी खलीच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

- Advertisement -

खली भारतातील एकमेव हेवीवेट चॅम्पियन आहे. देशातच नाही तर विदेशातही खली प्रसिद्ध आहे. खली प्रोफेशनल पैलवान आणि लिफ्टर आहे. खली त्याच्या उंचीवरुन सर्वात प्रसिद्ध आहे. खलीची उंची सात फूट आहे. खलीने अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड सिनेमातही काम केले आहे. अनेक वेळा अंडरटेकर आणि बिग शो सारख्या पैलवानांना धूळ चारली आहे. खलीच्या संपूर्ण प्रवासात त्याच्या आईचा मोठा सहभाग होता. आईच्या निधनाने खली सध्या मातृशोकात आहे.


हेही वाचा – डबल चीन कमी करण्यासाठी करा ‘हे’ योगा स्टेप फॉलो, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -