Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहचवण्यात 'या' सहा जणांचा हात; कोण आहेत खेळाडू?

मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहचवण्यात ‘या’ सहा जणांचा हात; कोण आहेत खेळाडू?

Subscribe

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स आज (26 मे) गतविजेत्या गुजरात टायटन्स विरुद्ध आयपीएल 2023 चा दुसरा क्वालिफायर सामना खेळणार आहे. एलिमिनेटरमध्ये लखनौचा 81 धावांनी पराभव करून मुंबईने पात्रता फेरीत प्रवेश केला आहे. पण पात्रता फेरीपर्यंत पोहचने मुंबईसाठी सोपे नव्हते, कारण मुंबईने लीग सामन्यातील 14 सामने खेळताना 8 सामन्यात विजय मिळवला आहे, तर त्यांना 6 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे मुंबईचे 16 गुण झाले होते. त्यामुळे मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू शकली. पण आरसीबी आपला शेवटचा सामना हरली आणि मुंबईला प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळाली. पात्रता फेरीत पोहचण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या सहा खेळाडूंचा महत्त्वाचा हात आहे. या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया… (The hand of ‘these’ six people in reaching Mumbai Indians in the playoffs)

1. पियुष चावला
भारताचा माजी अनुभवी 34 वर्षीय लेग-स्पिनर पियुष चावलाला 2020 आणि 2022 मध्ये एकाही संघाने त्याला खरेदी केले नव्हते. मिनी लिलावात मुंबईने त्याच्यावर विश्वास दाखवत 50 लाखांना विकत घेतले. मात्र तो बेंचवर बसून राहिल, त्याला खेळण्याची संधी मिळणार नाही असेच सर्वांना वाटत होते. पण मुंबईने त्याला खेळण्याची संधी दिली आणि तो संघाने दाखवले्लया विश्वासास पात्र ठरला. त्याने आतापर्यंत 15 सामने खेळताना 21 विकेट्स घेत दमदार पुनरागमन केले आहे. त्याच्या गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे.

- Advertisement -

2. टिळक वर्मा
हैदराबादचा 20 वर्षीय फलंदाज तिलक वर्माला मुंबई इंडियन्सने 1.70 कोटी रुपयांत विकत घेतले. तो यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत मुंबईसाठी 10 सामने खेळताना 150 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 300 धावा करताना 3 अर्धशतके केली आहेत. तो दुखापतीमुळे 5 सामन्यांमधून बाहेर होता, पण त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने उपयुक्त खेळी केली आहे.

3. टिम डेव्हिड
टीम डेव्हिडला मुंबई इंडियन्सने 2022 मध्ये 8.25 कोटींना खरेदी केले होते. डेव्हिड 8 सामने खेळताना 186 धावा केल्या आहेत. त्याने मुंबईसाठी फिनिशरची भूमिका चोख बजावली आहे. त्याने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सलग 3 षटकार मारताना मुंबईला विजय मिळवून दिला होता. त्याने या हंगामात डेव्हिडने 15 सामन्यात 160 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 229 धावा केल्या.

- Advertisement -

4. नेहल वढेरा
पंजाबकडून रणजी खेळणाऱ्या २२ वर्षीय खेळाडू नेहल वढेरावर मुंबई इंडियन्सने विश्वास दाखवला. वढेराला लिलावात मुंबईने फक्त 20 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते. नेहलने या हंगामात २ अर्धशतके झळकावताना चांगली खेळी केली आहे. त्याने लखनऊ सुपर जायंट्सच्या एलिमिनेटर सामन्यात 12 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 23 धावा करताना मुंबईला विजय मिळवून दिला.

5. आकाश मधवाल
उत्तराखंडचा आकाश मधवाल याने मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुसाठी २ वर्षे नेट बॉलर म्हणून जबाबदारी पार पाडली होती. या हंगामात मुंबईने त्याला 20 लाख या मूळ किंमतीत खरेदी केले. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळे मुंबईने त्याला संधी दिली, पण बेंचवर बसवून ठेवले होते. पण त्याला संधी दिल्यावर त्याने मुंबईसाठी 9 सामने खेळताना आतापर्यंत 13 विकेट घेत आपली छाप सोडली आहे. त्याने लीग सामन्यात हैदराबादविरुद्ध 4 विकेट्स घेतल्या होत्या, तर एलिमिनेटर सामन्यात लखनऊविरुद्ध त्याने फक्त 5 धावा देत 5 विकेट घेत दिग्गजांच्या यादीत जागा मिळवली आहे.

6. जेसन बेहरेनडॉर्फ
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फला 2022 च्या मिनी लिलावापूर्वी आरसीबीकडून विकत घेतले होते. जसप्रीत बुमराह, झाय रिचर्डसन सारखे दिग्गज गोलंदाज संघात नव्हते आणि जोफ्रा आर्चरही दुखापतीमुळे काही सामने खेळला नव्हता. त्यामुळे बेहरेनडॉर्फकडे वेगवान गोलंदाजीची आघाडी देण्यात आली आणि त्याने आतापर्यंत 11 सामने खेळताना 14 विकेट घेतल्या आहेत. त्याने पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी करताना जास्त विकेट घेतल्या आहेत.

 

- Advertisment -