घरक्रीडादशकातील विराट विक्रम खुणावतोय

दशकातील विराट विक्रम खुणावतोय

Subscribe

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौर्‍यावर आहे. ट्वेंटी-20 मालिका 3-0 गाजवल्यानंतर टीम इंडियाचे लक्ष वन डे व कसोटी मालिकेवर आहे. भारत आणि विंडीज यांच्यातील पहिला वन डे सामना पावसामुळे रद्द करावा लागला आणि रविवारी दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या सामन्यांत कर्णधार विराट कोहलीची बॅट तळपली नसली तरी कोहलीची प्रत्येक मोठी खेळी ही विक्रमाला कवेत घेणारी ठरते.त्यामुळे तो आता एका नव्या विक्रमासमीप येऊन पोहोचला आहे.

सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, अ‍ॅलन बॉर्डर आदी दिग्गजानांही असा विक्रम करणे जमलेले नाही.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका दशकात सर्वाधिक धावांचा विक्रम कोहलीच्या नावावर आहेच, पण त्याला याच कालावधीत असा एक विक्रम नोंदवण्याची संधी आहे, जो कोणालाही अद्याप जमलेला नाही. गावस्कर यांनी 1970-79 या कालावधीत 22 शतकांसह 5901 धावा केल्या आहेत. अ‍ॅलन बॉर्डर यांनी 1980-89 या कालावधीत 23 शतकांसह 12083 धावा केल्या आहेत. तेंडुलकरच्या नावावर 1990-99 या कालावधीत 46 शतकांसह 14197 धावा आहेत.

- Advertisement -

रिकी पॉटिंगने 2000-2009 या दशकात 55 शतकांसह 18962 धावा केल्या आहेत. तर विराटच्या नावावर 2010 – 2019 या कालावधीत 65 शतकांसह 19784 आंतरराष्ट्रीय धावा आहेत आणि त्याला 20000 धावा करण्याची संधी आहे. अशी कामगिरी केल्यास या दशकात 20000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -