घरक्रीडाभारतीय संघ आणि हाँगकाँगमध्ये होणार लढत, अशी असेल संघाचे प्लेइंग 11?

भारतीय संघ आणि हाँगकाँगमध्ये होणार लढत, अशी असेल संघाचे प्लेइंग 11?

Subscribe

आशिया चषक (Asia cup 2022) स्पर्धेला सुरुवात झाली असून अनेक संघांमध्ये अटीतटीचे सामने पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानविरोधातील विजयानंतर आज भारतीय संघाची हाँगकाँगविरोधात (team India Vs Hong Kong) लढत होणार आहे. भारतीय संघ आणि हाँगकाँग हे दोन संघ आमनेसामने भिडणार आहेत. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार असून कोणता संघ जिंकणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाकिस्तानविरोधात (Pakistan) झालेल्या सामन्यात भारताचा वेगवान खेळाडू केएल राहुलने उत्तम कामगिरी केली नव्हती. त्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) केएल राहुलला वगळून ऋषभ पंतला संधी देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारतीय संघाकडे दीपक हुडा (Deepak Hooda) हादेखील धडाकेबाज फलंदाज आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यालादेखील संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे.

- Advertisement -

भारतीय संघाचे संभाव्य प्लेइंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, आर अश्विन, आवेश खान, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.

- Advertisement -

हाँगकाँग संघाचे संभाव्य प्लेइंग 11

निजाकत खान (कर्णधार), बाबर हयात, यास्मिन मोर्तझा, किनचित शाह, स्कॉट मॅकेनी (यष्टीरक्षक), हारून अर्शद, एजाज खान, झिशान अली, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गझनफर.


हेही वाचा : 200 हून अधिक पदके जिंकणाऱ्या तरुणाची हत्या; हरियाणातील धक्कादायक घटना


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -