घरक्रीडाराहिचे मिशन ऑलिम्पिक लक्ष्यभेद

राहिचे मिशन ऑलिम्पिक लक्ष्यभेद

Subscribe

महाराष्ट्राची तरुण नेमबाजपटू राही सरनौबतने २०२० साली जपानच्या टोकियो शहरात होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. म्यूनिच शहरात सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत राहीने २५ मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

राहीसोबत भारताचा युवा नेमबाज सौरभ चौधरीनेही पुरुषांच्या १० मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.याआधी राही सरनौबतने आपल्या दुखापतीवर मात करत आशियाई खेळांमधून पुनरागमन केले होते. म्यूनिच येथील स्पर्धेत राहीसोबत मनू भाकेरचाही समावेश होता. अंतिम फेरीत मनूने राहीच्या तुलनेत चांगली सुरुवात करत आघाडीही घेतली होती.

- Advertisement -

मात्र सातव्या फेरीत तिच्या बंदुकीमध्ये बिघाड झाला आणि मनू पिछाडीवर पडली. राहीने आपल्या कामगिरीत सातत्य कायम राखत सुवर्णपदकावर मोहर उमटवली. भारतीय संघ या स्पर्धेत, ३ सुवर्ण पदकांसह आघाडीवर असून चीन एक सुवर्ण, एक रौप्य व तीन कांस्य पदकांसह दुसर्‍या स्थानी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -