घरक्रीडापदकांसाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज

पदकांसाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज

Subscribe

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतच्या मते या मोसमात एकही जेतेपद न मिळवणे आणि उपांत्यपूर्व फेरीआधीच सामने गमावणे हे निराशाजनक होते. तसेच यापुढे जागतिक चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवायची असल्यास मानसिक व शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्याची गरज आहे, असेही श्रीकांत म्हणाला. श्रीकांतने २०१७ मध्ये ४ स्पर्धा जिंकल्या होत्या. मात्र, मागील १५ महिन्यांत तो ९ वेळा उपांत्यपूर्व फेरीत आणि २ वेळा उपांत्य फेरीत पराभूत झाला आहे.

माझ्यामते सतत उपांत्यपूर्व फेरीत पराभूत होणे फार निराशाजनक आहे, मी पहिल्या फेरीतच पराभूत झालो असतो तर इतका निराश झालो नसतो. मी काही खेळाडूंविरुद्ध सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे, तर काही खेळाडूंविरुद्ध उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत चांगले प्रदर्शन न केल्यामुळे पराभूत झालो आहे. त्यामुळे पूर्ण चालणार्‍या स्पर्धेत मला कसे चांगले खेळता येईल यावर मी लक्ष केंद्रित केले आहे. जर मी जागतिक चॅम्पियनशिपच्या आधी ३-४ महिने चांगला खेळत असेन, तसेच मानसिक व शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम झालो, तर जागतिक चॅम्पियनशिपमध्ये मी चांगली कामगिरी करू शकेन असे मला वाटते, असे श्रीकांत म्हणाला.

- Advertisement -

तसेच पुढे त्याने सांगितले की, मी फिटनेस सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. २०१७ च्या शेवटी आणि २०१८ मध्ये मला बर्‍याच दुखापती झाल्या. त्यामुळे जर मी माझी फिटनेस सुधारली, तर मलाही विविध स्पर्धा जिंकण्याची चांगली संधी आहे.

इंडियन ओपनमध्ये श्रीकांत, सिंधूवर लक्ष

- Advertisement -

माजी विजेते किदाम्बी श्रीकांत आणि पी.व्ही.सिंधू यांच्या इंडियन ओपनमधील कामगिरीकडे सार्‍यांची नजर असणार आहे. दुखापतीमुळे सायना नेहवाल या स्पर्धेला मुकणार आहे. महिलांमध्ये जागतिक क्रमवारीतील अव्वल दोन खेळाडू ताई झू यिंग आणि चेन युफेई या स्पर्धेत खेळणार नसल्याने सिंधूला ही स्पर्धा जिंकण्याचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. तसेच पुरुषांमध्ये जेतेपदासाठी श्रीकांत आणि व्हिक्टर अ‍ॅक्सेलसन यांना दावेदार मानले जात आहे. अ‍ॅक्सेलसननेच मागील वर्षी ही स्पर्धा जिंकली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -