Eco friendly bappa Competition
घर क्रीडा श्रीलंकेच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले, तब्बल १९८ धावांनी धुव्वा

श्रीलंकेच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले, तब्बल १९८ धावांनी धुव्वा

Subscribe

नवी दिल्ली : न्यूझीलंड संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेला २७५ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 19.5 षटकांत अवघ्या 76 धावांत सर्वबाद झाला. त्यामुळे न्यूझीलंड संघाने हा सामना तब्बल १९८ धावांनी जिंकला.

श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना फिन ऍलन आणि डॅरिल मिशेलच्या दमदार खेळीमुळे न्यूझीलंड संघाने 49.3 षटकांत 274 धावा केल्या. त्याच्याशिवाय ग्लेन फिलिप्सने 39 आणि रचिन रवींद्रने 49 धावा केल्या. त्याचबरोबर श्रीलंका संघाकडून चमिका करुणारत्नेने 9 षटकांत ४३ धावा देत सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. याशिवाय कसून-लाहिरू यांना प्रत्येकी 2 विकेट, तर दिलशान आणि शनाका यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

- Advertisement -

हेही वाचा – क्रिकेटर्स अभिनय करणार तर कलाकारही…; जाहिरातीचा 3 इडियट्स स्टाईल व्हिडीओ व्हायरल

यानंतर 275 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाची खराब सुरुवात झाली. दोन्ही सलामीवीर अवघ्या 13 धावांवर बाद झाले. यानंतर कुसल मेंडिस खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. संघाकडून अँजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 25 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 18 धावा केल्या. न्यूझीलंडकडून हेन्री शिपलीने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर डॅरिल मिशेल आणि ब्लेअर टिकनर यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या.

- Advertisement -

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने यजमानांनी श्रीलंकेच्या संघाला विजयासाठी २७५ धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 19.5 षटकांत अवघ्या 76 धावांत सर्वबाद झाला. त्यामुळे न्यूझीलंडने पहिला वनडे सामना 198 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. न्यूझीलंड संघाचा हा एकदिवसीय क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत 7वा सर्वात मोठा विजय आहे.

हेही वाचा – धोनीसारखाच ‘हा’ खेळाडू रेल्वेत नोकरीला, आयपीएलमध्ये येताच बनला करोडपती

- Advertisment -