Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील निलंबनाची कारवाई रद्द होण्याची शक्यता, फिफाच्या अटी मान्य

अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील निलंबनाची कारवाई रद्द होण्याची शक्यता, फिफाच्या अटी मान्य

Subscribe

अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील निलंबनाची कारवाई रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली होती. परंतु आज सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली. यामध्ये एआयएफएफच्या दैनंदिन व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त केलेली तीन सदस्यीय प्रशासकीय समिती न्यायालयाने रद्द केली आहे.

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने आदेशात म्हटले की, एआयएफएफचे दैनंदिन व्यवस्थापनाचे काम केवळ कार्यकारी महासचिव यांच्या नेतृत्वाखालील एआयएफएफ प्रशासनाद्वारे पाहिले जाणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, एआयएफएफच्या निवडणुकांची तारीख देखील कोर्टाने एक आठवड्यासाठी पुढे ढकलली आहे. २८ ऑगस्ट रोजी एआयएफएफ निवडणूक होणार होती. परंतु कोर्टाच्या आदेशानुसार, निवडणूक मतदार यादीमध्ये केवळ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ३६ सदस्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.

भारतीय फुटबॉल महासंघाच्या कारभारात तिसऱ्या पक्षाकडून होणाऱ्या हस्तक्षेपामुळे ही कारवाई करण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीला फिफाने महासंघाला तसा इशारा देखील दिला होता. हा इशाला देताना या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या १७ वर्षाखालील महिलांच्या फुटबॉल वर्ल्डकपचे आयोजकपद काढून घेण्याचा इशारा फिफाने दिला होता.

- Advertisement -

विशेष म्हणजे फिफाने दिलेला इशारा हा सुप्रीम कोर्टाने महासंघाच्या निवडणुकी संदर्भात दिलेल्या आदेशानंतर काही दिवसांनी देण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाकडून नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकिय समितीकडून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली. ११ ते ३० ऑक्टोबर दरम्यान भारतात १७ वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होणार होते. भारताला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते. मात्र, फिफाच्या नियमांनुसार झालेल्या कारवाईमुळे भारतात ही स्पर्धा आयोजित होईल की नाही याबाबत शंका आहे.


हेही वाचा : दोन सामने जिंकणाऱ्या भारताचा झिम्बाब्वेबरोबर रंगणार तिसरा सामना, कधी होणार?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -