घरक्रीडाअंपायरला यापुढे 'Soft Singnal' देता येणार नाही; आयसीसीकडून नियमांत बदल

अंपायरला यापुढे ‘Soft Singnal’ देता येणार नाही; आयसीसीकडून नियमांत बदल

Subscribe

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखालील समितीने मैदानावरील पंचांनी दिलेला ‘Soft Signal’ रद्द केला आहे. याशिवाय फ्री हिटवर चेंडू स्टंपवर आदळला तर फलंदाजाला आता धाव घेण्याची मुभा देण्यात आली आहे. अंपायरगने दिलेल्या सॉफ्ट सिग्नलवर अनेक वेळा टीका होतना दिसत असल्यामुळे आयसीसीने हा नियम काढून टाकला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (ICC) क्रिकेटमध्ये नवनवीन नियम आणताना आधीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. परंतु आयसीसीने आता एक नियम रद्द केला आहे. बहुतेक वेळा कठीण झेल पकडल्यावर त्याची पुष्टी करणे अंपायरला सोपे जात नव्हते. त्यामुळे आयसीसीने अंपायरला झेलची पुष्टी होईपर्यंत ‘सॉफ्ट सिग्नल’ सांगण्याची मुभा दिली होती. यानुसार मैदानावरील अंपायरला एखाद्या निर्णयाबाबत शंका असल्यास ते तिसऱ्या पंचाची मदत घेत होते. या दरम्यान ते फलंदाजाला सॉफ्ट सिग्नलनुसार बाद आहे की नाही हे सांगत होते.

- Advertisement -

मैदानावरील अंपायरच्या सॉफ्ट सिग्नलचा थर्ड अंपायरच्या निर्णयाशी खूप संबंध असतो. जेव्हा मैदानावरील अंपायर कोणत्याची अचूक निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा तो फक्त सॉफ्ट सिग्नल देऊ शकतो. सीईसीने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील पुरुष क्रिकेट समिती आणि महिला क्रिकेट समितीच्या शिफारशी मंजूर केल्यानंतर आयसीसीने ‘खेळण्याच्या नियमात’ बदल जाहीर केले आहेत.

सॉफ्ट सिग्नल रद्द करण्यात आला
आयसीसीने नियमात बदल करताना सॉफ्ट सिग्नल रद्द केला आहे. आयसीसीने सांगितले की, मैदानावरील अंपायरला यापुढे निर्णय जाहीर करताना टीव्ही अंपायरला सॉफ्ट सिग्नल देण्याची आवश्यकता नाही. मैदानावरील अंपायर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी टीव्ही अंपायरचा सल्ला घेतील. माजी भारतीय कर्णधार गांगुली म्हणाला की, गेल्या वर्षीच्या क्रिकेट समितीच्या बैठकांमध्ये ‘सॉफ्ट सिग्नल’वर चर्चा करण्यात आली. समितीने यावर चर्चा करताना असा निष्कर्ष काढला की, सॉफ्ट सिग्नल अनावश्यक होते. कारण बहुतेक वेळा झेलचे रिप्ले पाहिल्यास ते अनिर्णित आले आहेत.

- Advertisement -

हेल्मेटबाबत नवीन नियम
जास्त जोखीम असलेल्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आता हेल्मेट अनिवार्य करण्यात आला आहे. फलंदाजांना वेगवान गोलंदाजांचा सामना करताना हेल्मेट अनिवार्य असेल. याशिवाय जेव्हा यष्टीरक्षक स्टंपच्या जवळ उभा असेल आणि फलंदाजासमोर क्षेत्ररक्षक करताना खेळाडू उभा असेल तर त्याला हेल्मेट घालावे लागेल. गांगुलीने सांगितले की, आम्ही खेळाडूंच्या सुरक्षेबाबतही चर्चा केली, जी आमच्यासाठी खूप महत्त्वाची होता. खेळाडूंच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी काही विशिष्ट परिस्थितीत हेल्मेट वापरणे अनिवार्य करणेच योग्य आहे, असा निर्णय समितीने घेतला आहे.

फ्री हिट नियमात बदल
फ्री हिट नियमात किरकोळ बदल करण्यात आला आहे. चेंडू स्टंपला लागल्यावर फ्री हिटवर काढलेली कोणतीही धाव यापुढे मोजली जाणार आहे. याचा अर्थ असा की, फ्री हिटवर गोलंदाजाने टाकलेला चेंडू स्टम्पवर लागल्यावर यापुढे फलंदाज धाव घेऊ शकणार आहे. आयसीसीचे सर्व नवीन बदल येत्या बदल 1 जून 2023 पासून लागू होतील. अशा स्थितीत इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील चार दिवसांच्या लॉर्ड्स कसोटीत पहिल्यांदाच बदलेल्या नियमांचा वापर होणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही या नियमांचा वापर केला जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -