घरक्रीडामहिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ युनायटेड किसान मोर्चा देशव्यापी आंदोलन करणार

महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ युनायटेड किसान मोर्चा देशव्यापी आंदोलन करणार

Subscribe

बृजभूषण सिंहला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यासाठी एसकेएमचे शिष्टमंडळ दिल्ली पोलीस आयुक्त, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मुंबई | मलिला कुस्तीपटूंनी (Women Wrestlers) भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाचा (Sexual Abuse) आरोप केला आहे. यानंतर महिला कुस्तीपटूंनी २३ एप्रिलपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. या महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला युनायटेड किसान मोर्चाने पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर युनायटेड किसान मोर्चा (United Kisan Morcha) बृजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी ११ त १८ मे या कालावधीत देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनादरम्यान देशातील सर्व राज्याच्या राजधानी, जिल्हा मुख्यालये आणि तहसील मुख्यालयसमोर निरर्शन करणार आहेत.

त्या पूर्वीच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील एसकेएमचे जेष्ठ नेते, शेकडो शेतकरी आणि महिला रविवारी जंतर-मंतरवर महिला कुस्तीपटूंच्या आंदोलन सहभागी झाले, अशी माहिती एसकेएमच्या नेत्यांनी दिली आहे.

- Advertisement -

बृजभूषण सिंहला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यासाठी एसकेएमचे शिष्टमंडळ दिल्ली पोलीस आयुक्त, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एसकेएमच्या ११ ते १८ मेदरम्यान होणाऱ्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतळ्यांचे दहन करण्यात येणार आहे.

हेही वाचा – Wrestlers Protest: एक आरोप जरी सिद्ध झाला तर मी गळफास घेईन; बृजभूषण सिंह यांचा दावा

- Advertisement -

पंजाबमधील महिला शेतकरी कुस्तीपटूंच्या आंदोलनात सहभागी

पंजाबच्या महिला शेतकऱ्यांचा गट महिला कुस्तीपटूंना समर्थनार्थ करण्यासाठी रविवार जंतर-मंतरमधील आंदोलनाक सहभागी झाले होते. यावेळी एसकेएम महिला कुस्तीपटूंच्या समर्थनाथ देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली. बृजभूषण शरण सिंह यांंच्या अटकेच्या मागणीसाठी ११ ते १८ मे या कालावधीत युनाटेड किसान मोर्चा देशातील सर्व राज्यांच्या राजधानी, जिल्हा मुख्यालये आणि तहसील मुख्यालयावर निदर्शन करणार आहेत.

हेही वाचा – “आरोपी म्हणून मी राजीनामा देणार नाही”, बृजभूषण सिंहांची पहिली प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -