Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा माझी मेस्सीसोबत तुलना होऊच शकत नाही; सुनील छेत्रीने केले स्पष्ट

माझी मेस्सीसोबत तुलना होऊच शकत नाही; सुनील छेत्रीने केले स्पष्ट

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये छेत्रीने आतापर्यंत ७४ गोल केले असून मेस्सीच्या नावे ७२ गोल आहेत.

Related Story

- Advertisement -

भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला मागे टाकत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या सक्रिय खेळाडूंमध्ये दुसरे स्थान पटकावले. मेस्सी हा फुटबॉलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्यामुळे ज्या लोकांना खरेच फुटबॉल कळते, त्यांना माझी आणि मेस्सीची कधीही तुलना होऊ शकत नाही, ही गोष्ट माहित असल्याचे छेत्री म्हणाला. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये छेत्रीने आतापर्यंत ७४ गोल केले असून मेस्सीच्या नावे ७२ गोल आहेत.

लोकांच्या मताचा आदर पण… 

लोकांची काही मते असतात आणि त्यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. मी त्यांच्या मताचा आदर करतो. मात्र, तुम्हाला माझे मत जाणून घ्यायचे असेल, तर माझी आणि मेस्सीची तुलना होऊ शकत नाही. केवळ मेस्सीच नाही, तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या कोणत्याही खेळाडूशी माझी तुलना होऊ शकत नाही, असे छेत्रीने सांगितले.

इतक्यात निवृत्त होण्याचा विचार नाही

- Advertisement -

तुम्हाला माझ्यापेक्षा हजारो दर्जेदार फुटबॉलपटू मिळतील आणि हे सर्व फुटबॉलपटू मेस्सीचे चाहते असतील. ज्या लोकांना खरेच फुटबॉल कळले, त्यांना माहिती आहे की, माझ्यात आणि मेस्सीमध्ये तुलना होणे शक्य नाही. परंतु, मी माझ्यासाठी देशासाठी १०० हून अधिक सामने खेळल्याचा मला अभिमान आहे, असे छेत्री म्हणाला. तसेच मी इतक्यात निवृत्त होण्याचा विचार करत नसल्याचेही ३६ वर्षीय छेत्रीने स्पष्ट केले.

- Advertisement -