घरक्रीडावर्ल्डकपसाठी संघात घेण्याची मागणी केली नाही!

वर्ल्डकपसाठी संघात घेण्याची मागणी केली नाही!

Subscribe

दक्षिण आफ्रिकेच्या संघाची यंदाच्या विश्वचषकातील कामगिरी निराशाजनक होती. त्यांना ९ पैकी केवळ ३ साखळी सामने जिंकता आले. त्यामुळे त्यांच्या संघ निवडीवर बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच विश्वचषक सुरु असताना मागील वर्षी निवृत्त झालेल्या एबी डिव्हीलियर्स निवृत्ती मागे घेत विश्वचषकात पुन्हा द.आफ्रिकेसाठी खेळण्याची तयारी दर्शवली, पण क्रिकेट बोर्ड आणि संघ व्यवस्थानाने त्याला संघात घेण्यास नकार दिला, अशी माहिती समोर आली होती. मात्र, मी विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकन संघात घेण्याची मागणी केलीच नव्हती, असे डिव्हीलियर्स आता स्पष्ट केले आहे.

आता दक्षिण आफ्रिकेचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आल्याने मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. विश्वचषकादरम्यान माझ्यावर जी टीका झाली, ती योग्य होती असे मला वाटत नाही. मे, २०१८ मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. यामागे घरच्यांना वेळ देणे आणि शारीरिक ताण कमी करणे, ही कारणे होती. मात्र, त्यावेळी काही लोकांनी मी जास्त पैसे कमावता यावे यासाठी मी निवृत्ती घेतल्याचा आरोप केला. मी निवृत्त झाल्यानंतर माझ्यात आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेत कोण्यातही प्रकारचा संवाद झाला नाही.

- Advertisement -

मी माझा निर्णय घेतला आणि संघाने त्यांचा. त्यांना प्रशिक्षक ओटीस गिब्सन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्णधार फॅफ डू प्लेसिसच्या नेतृत्त्वात खूप यश मिळाले. मी आणि फॅफ जुने मित्र आहोत. त्यामुळे आम्ही सतत संवाद साधत असतो. विश्वचषकासाठी संघाची घोषणा होण्याआधी दोन दिवस मी त्याच्याशी चर्चा केली होती. मी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. त्यामुळे गरज असल्यास मी द.आफ्रिकेसाठी पुन्हा खेळायला तयार आहे, असे त्याला सांगितले. मात्र, मी संघात घेण्याची मागणी अजिबातच केली नाही.

परंतु द.आफ्रिकेने भारताविरुद्धचा सामना गमावला, जो त्यांचा सलग तिसरा पराभव होता, त्या सामन्यानंतर अचानकच आमच्यातील खाजगी संभाषण मीडियामध्ये आले. मी किंवा फॅफने ही माहिती मीडियाला दिली नाही. मात्र, कदाचित दक्षिण आफ्रिकेचा संघ पराभूत होत असल्याचे खापर फोडण्यासाठी त्यांना कोणाची तरी गरज होती. ही माहिती बाहेर आल्याने माझ्यावर बरीच टीका झाली. मला गर्विष्ठ, स्वार्थी म्हटले गेले, पण मी कोणत्याही प्रकारची मागणी केली नव्हती. जर संघाला गरज पडली, तर मी पुन्हा द.आफ्रिकेसाठी खेळायला तयार होतो. मात्र, संघाने वेगळ्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला, ज्याचे मला अजिबातच वाईट वाटले नाही. मी माझ्या देशासाठी खेळलो आणि नेतृत्त्वही केले याचा मला अभिमान आहे, असे विधान डिव्हीलियर्सने केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -