घरICC WC 2023या अश्रूंची कधीतरी फुले होतील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून रोहित शर्माला प्रोत्साहन

या अश्रूंची कधीतरी फुले होतील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून रोहित शर्माला प्रोत्साहन

Subscribe

मुंबई : एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल, रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी लढत झाली. हा सामना सहा विकेट्सने हा सामना जिंकला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याच्या डोळ्यात अश्रू तरळले. हाच व्हिडीओ शेअर करत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ‘या अश्रूंची कधीतरी फुले होतील,’ अशा शब्दांत त्याला प्रोत्साहन दिले आहे.

हेही वाचा – आरक्षणाच्या नावावर नुरा कुस्ती कशासाठी चालू आहे? सुषमा अंधारेंचा भुजबळांना थेट सवाल

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने 50 षटकांत सर्वबाद 240 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 50 षटकांत 241 धावा करायच्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या अवघ्या 47 धावांत तीन विकेट पडल्यानंतर भारतीय संघाला हुरूप आला. पण ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव डाव सावरला. या दोघांनी 192 धावांची भागिदारी केली आणि ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला मात देत पुन्हा सहाव्यांदा विश्वचषचकावर नाव कोरले.

- Advertisement -

तत्पूर्वी, भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेतील सलग 10 सामने अगदी सहजपणे जिंकले होते. त्यामुळे विश्वचषकाचे प्रबळ दावेदार टीम इंडियाच समजली जात होती. पण ढेपाळलेली फलंदाजी आणि ऑस्ट्रेलियाची चिवट झुंज यापुढी भारताला पराभव पत्करावा लागला. म्हणूनच भारतीय कर्णधार रोहित शर्मा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. ते दृश्य पाहून तमाम भारतीय क्रिकेट रसिकांचे मन हळहळले.

हेही वाचा – महाराष्ट्रासह देशात थंडीचा कडाका वाढला; ‘या’ राज्यातील हवामान बदलणार

याच पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत रोहित शर्माला प्रोत्साहन दिले आहे. रोहित तू आणि तुझ्या संघाने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली. रविवारचा दिवस मात्र तुमचा नव्हता. या केवळ एका पराभवाने तुमचे परिश्रम वाया जाणार नाहीत आणि त्या आधारावर तुमच्या गुणवत्तेचे मोजमाप देखील होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. संपूर्ण देश तुझ्या टीमसोबत भक्कमपणे उभा आहे. या अश्रूंची कधीतरी फुले होतील. आम्हाला तुम्हा सर्वांचा नेहमीच अभिमान राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -